ताज्या घडामोडी

नांदगावला मविप्र संस्थेच्या” होरायझन अकॅडमीला नूतन इमारत मंजूर

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.29 नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळ अन् पाण्याची कमतरता म्हणून सरकारी अथवा खाजगी कुठल्याही औद्योगिक वसाहती व दर्जेदार शिक्षण आदि सर्व सुविधांपासून तालुका कायमस्वरूपी वंचितच होता.निवृत्तांच्या गावात ज्या ठिकाणी भौतिक सुविधांची वाणवा अशा ठिकाणी दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि अमित बोरसे-पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नांदगावला होरायझन अकॅडमी (CBSE) पॅटर्न च्या अभ्यासक्रमाला सुरुवात झाली अन नर्सरी ते पाचवी पर्यंतचे पहिल्याच वर्षी साडेचारशेच्या वर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.

शेतीसाठी पाणी, औद्योगिक वसाहत आणि त्याचबरोबर दर्जेदार शिक्षण आदी सर्व सुविधांपासून वंचित असलेल्या तालुक्यातील ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी बाहेरगावी पाठवावे लागत असे. खर्च करूनही बाहेरगावी राहण्याखाण्याची परवड व होणारी आबाळ यामुळे या भागातील पालकांना मोठी आर्थिक झळ बसत असे. या सर्वांना आता तालुक्यात सुविधा उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.अन्य तालुक्यातील CBSE संकुलासारखे एक संकुल तालुक्यात व्हावे यासाठी मविप्रचे युवा संचालक इंजी अमित बोरसे-पाटील यांची धडपड सुरू होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन त्यांनी संस्थेचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे यांच्यासह सर्व पदाधिकारी मंडळ व संचालक मंडळ यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला व त्यास मान्यता देखील मिळाली.होरायझन अकॅडमी सुरू करण्यासाठी सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करणे गरजेचे होते. त्यासाठी आर्थिक निधीची आवश्यकता होती. असा निधी व सुविधा मिळाल्यानंतर देखील तालुक्यातील पालकांसह विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो हा प्रश्न होता. मात्र पहिल्याच वर्षी उदंड प्रतिसाद मिळाला आणि पालकांचे दीर्घ काळाचे स्वप्न अशा रीतीने प्रत्यक्षात उतरले.

*प्रवेशासाठी जोरदार प्रतिसाद*

पहिल्याच टप्प्यात नर्सरी ते पाचवी पर्यंतचे पहिल्या वर्षी ४५० विद्यार्थ्यांवर प्रवेश निश्चित झाले.जून पर्यंत हा आकडा ५०० पेक्षा जास्त राहील. ज्ञानदानासाठी उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक वर्गाची एकूण पाच वेगवेगळ्या पद्धतीने मुलाखती घेऊन तालुका संचालक इंजि.अमित बोरसे-पाटील शिक्षणाधिकारी बी.डी.पाटील होरायझन अकॅडमीच्या प्राचार्या श्रीमती पी.डी.मढे यांनी शिक्षकांची निवड केली आहे. निवड झालेल्या शिक्षकांचे संस्थेच्या नाशिक परिसरातील होरायझन अकॅडमीत १५ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झालेले असून २४ मे पासून ३१ मे पर्यंत संस्थेच्या तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. शहर तसेच ग्रामीण भागातून देखील प्रवेशासाठी उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातील पालकांना अगदी जवळच दर्जेदार शिक्षण मिळण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.चालू वर्षी हा अभ्यासक्रम मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगावच्या प्रांगणात असून पुढील वर्षी सर्व सोयी सुविधा युक्त नूतन इमारत उपलब्ध केली जाणार आहे.या संकुलासाठी संस्थेचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे पदाधिकारी मंडळ व संचालक मंडळ यांनी तात्काळ परवानगी दिल्याने जागेची उद्भवणारी समस्या यामुळे मार्गी लागली आहे. तालुक्यात आता अत्यल्प दरात CBSE पॅटर्नचे शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना शक्य झाल्याबद्दल पालकांनी ॲड. नितीन ठाकरे, तसेच कार्यकारी मंडळ, संचालक मंडळ व नांदगाव तालुका संचालक इंजि अमित बोरसे-पाटील यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.