ताज्या घडामोडी

नांदगावला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात : आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रतिपादन

नांदगाव शहर व तालुक्यात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव उत्साहात साजरी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.01 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याची जनतेला सतत जाणीव राहावी या वास्तव राजमातेचा पूर्णकृती पुतळा उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून,तसेच शहरातील हमालवाडा परिसराचे नाव राजमाता अहिल्यादेवीनगर असे नामकरण लवकरच केले जाईल,असे प्रतिपादन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले.


शुक्रवार ता ३१ रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार.सुहास आण्णा कांदे यांनी नांदगाव शहरातील हमालवाडा व अहिल्याबाई चौकातील जयंती उत्सव कार्यक्रमांना हजेरी लावत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना आभिवादन करत उपस्थित जनसमुदायला संबोधित केले.

यावेळी हमालवाड्याचे नाव राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्याबाबत नांदगाव नगरपरिषदेला आदेश केला जाईल.तसेच या ठिकाणी येत्या चार जूननंतर सभामंडप बांधून देण्याचेही आमदार श्री . कांदे यांनी यावेळी जाहीर केले.

नांदगाव शहर व तालुक्यात ग्रामीण भागात ही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव उत्साहात साजरी करण्यात आली

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,प्रमोद भाबड,सागर हिरे, सुनील जाधव, डॉ गणेश चव्हाण,शशी सोनावणे,प्रकाश शिंदे,पत्रकार संतोष कांदे, बिरू शिंदे,गंगाधर कर्नर,सीताराम देवकाते,तुकाराम शिंदे,निवृत्ती शिंदे, मयूर सूळ,जय तांबे,सुनील सोर,शरद आयनोर,राजेश शिंदे,भिका खटके, बाळासाहेब बोरकर,विठ्ठल देवकाते,उमेश कन्नोर,मिथुन शिंदे,गीता शिंदे,माया गोटे,अँड.विद्याताई कसबे,नेहा कोलगे,प्रमिला चव्हाण,संगीता तांबे, आदीसह जय मल्हार ग्रुपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.