ताज्या घडामोडी

गर्जा महाराष्ट्र / स्टार न्युज इम्पॅक्टः नांदगाव – येवला महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात…

गर्जा महाराष्ट्र न्यूज व स्टार न्युज च्या बातमीच्या दणक्याने नांदगाव येवला मुख्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात.

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.०२ गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज व नाशिक स्टार न्युज वरील बातमीच्या दणक्याने, येवला बांधकाम विभागासह बांधकाम कंपनीला जाग आली आहे. त्यांनी नांदगाव – येवला या मुख्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केलीय.त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

सार्वजनिक बांधकाम येवला विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या नांदगाव येवला महामार्गावर डांबरीकरण झालेल्या कामावर महाकाय खड्डयांचे साम्राज्य पसरले होते. या. या मार्गाच्या नूतनीकरण कामासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था जैसे थे आहे. या खड्यामुळे महामार्गावर खड्यांचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे या खड्डयांमुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांनी या खड्डयांविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे अखेर याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरील मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज व नाशिक स्टार न्युज वृत्त वाहिनीने या महामार्गावरील या खड्डयांचे स्पॉट पंचनामे करत रस्त्यांचं भेसूर वास्तव समोर आणलं होतं. याच बातमीची दखल आता बांधकाम विभागाने घेतली असून आता या महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे., परंतु हे खड्डे निकृष्ट दर्जाचे बुजवले जात असून दहा ते पंधरा दिवसांनी पुन्हा या महामार्गावर खड्डे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तर या विषयी बाणगाव येथिल स्थानिक नागरिक समाधान देवकर म्हणाले, की गर्जा महाराष्ट्र २४ न्युज व नाशिक स्टार न्युज ने वेळोवेळी रस्त्यावर असणाऱ्या खड्याची बातमी दाखवली आहे. आता कुठेतरी काम सुरू झालं आहे. मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं सुरू असून यामुळे पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजुन पावसाळा सूरू झाला नाही, त्यामुळे प्रशासनाने थातुरमातुर काम करण्यापेक्षा, चांगले खड़े बजवावीत. ज्याने करून पुन्हा खड्डे पडणार नाही अशी अपेक्षा नागरीक करीत आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.