राज्यात आजपासुन पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज
पुणे : आजपासून (ता. ३) राज्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांसह,पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान,अरबी समुद्रातून मॉन्सूनची वाटचाल सुरू झाली आहे.पुढील काही दिवसांत मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असल्याने जोरदार पावसासह मॉन्सूनच्या आगमनाचे वेध लागले आहेत.यातच उन्हाचा चटका कायम असल्याने विदर्भ होरपळत आहे.तर उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका असह्य होत असून, उकाडा त्रासदायक ठरत आहे. विदर्भात उन्हाची लाट कायम असल्याने ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४६.५ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान ४४ अंशांच्या पुढे आहे. आज (ता. ३) उत्तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार आहे.
राज्याच्या दक्षिणेकडील भागात सापेक्ष आर्द्रता वाढत असून, पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रवाह बळकट होत आहेत. यावरून मॉन्सूनच्या आगमनास पोषक हवामान होत आहे. आजपासून (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये, तसेच पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
#######
उष्ण,दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट)
पालघर,ठाणे.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
सिंधुदुर्ग,नगर,पुणे,सातारा,सांगली,सोलापूर, कोल्हापूर,बीड, धाराशिव,लातूर,नांदेड,वर्धा,नागपूर,भंडारा, गोंदिया.



