मॉन्सूनची वेगवान प्रगती ; यंदा मॉन्सून यंदा महाराष्ट्रात लवकर दाखल

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज
पुणे ता.३ :मॉन्सून यंदा महाराष्ट्रातही लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे .अरबी समुद्रातून प्रवाह वेगवान झाल्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. केरळमध्ये वेळेआधीच दाखल झालेला आहे. त्यामुळे मॉन्सून च्या पुढील वाटचालीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार बेटसमुह आणि अरबी समुद्रातील मालदीवमध्ये १९ मे रोजी आगमन केल्यानंतर केरळमध्ये दोन दिवस आधीच (ता.३०) मॉन्सून डेरेदाखल झाला. त्यानंतर उपसागरातील रेमल पूर्व भारतात मॉन्सूनची प्रगती सुरूच होती.रविवारी (ता.२) मॉन्सूनने अरबी समुद्रातून वाटचाल सुरू केली.संपूर्ण केरळ,तमिळनाडू व्यापून वाऱ्यांनी दक्षिण कर्नाटकमधील मंगलूरू,चित्रदुर्ग ते आंध्र प्रदेशातील नेल्लूर पर्यंतच्या भागापर्यंत मजल मारली आहे.बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सूनने प्रगती केली आहे.

पुढील वाटचालीस पोषक हवामान
पुढील दोन दिवसांत मध्य अरबी समुद्र,कर्नाटकचा आणखी काही भाग, रायलसीमा,आंध्र प्रदेशचा किनारपट्टीय भाग,बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान आहे,



