नांदगावला होरायझन अकॅडमीत चिमुकल्यांच्या बहारदार नृत्याने जिंकली मने..
होरायझन इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगांव ता.२८ एक से बढकर एक सुमधुर गीतांच्या ठेक्यावर ताल धरलेले चिमुकले.. त्यासाठी देखागा व सुंदर बनविलेला आकर्षक रंगमंच… त्यावर ताल,सुर अन लयबद्ध ठेका धरत नृत्य करणारे चिमुकले..आकर्षक आणि वेगवेगळी वेशभूषा करून आपली कला सादर करण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी,कधी मराठमोळ्या गाणी तर कधी हिंदीतील गीतांवर सादर होणारी एका वरचढ, एक धडाकेबाज नृत्ये, त्याला उपस्थित पालकांची मिळणारी दाद.अशा या गीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाने उपस्थितांच्या डोळयाचे पारणे फिटले.याला उपस्थित पालकांची मिळणारी वाहवा…अशा वातावरणात नृत्य सादर करणारे चिमुरडे भावुन गेले. निमित्त होते होरायझन इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे

मराठा विद्या प्रसारक समाजाचे,होरायझन अकॅडमी नांदगाव या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेविका श्रीमती अंजुमताई कांदे होत्या कार्यक्रमाचे आयोजक इंजी.अमित बोरसे-पाटील व होरायझन ॲकॅडमीच्या प्राचार्या पुनम डी मढे या होत्या


या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा अंजुमताई कांदे व मविप्र संचालक इंजि.अमित बोरसे-पाटील व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व मविप्र समाज संस्था कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी मविप्र नांदगाव तालुका संचालक यांनी आपल्या भाषणात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली.होरायझन अकॅडमी ही नांदगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी शाळा आहे. संस्थेच्या माध्यमातून नांदगाव तालुक्यात विविध शैक्षणिक कार्य सुरू आहे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. अध्यक्षीय भाषणात अंजूमताई कांदे म्हणाल्या की नांदगाव तालुक्यात एवढा भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम बघितला नव्हता. तो मला होरायझन ॲकॅडमी नांदगाव या शाळेच्या सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने बघायला मिळाला.या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळतंय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तालुका दुष्काळाचा सामना करत होता त्यात शैक्षणिक दुष्काळही होता परंतु हा दुष्काळ संचालक अमित भाऊंनी वेळोवेळी पाठपुरावा करून मविप्रच्या होरायझन अकॅडमी तसेच मविप्र संचलित इतर संकुलामध्ये नवनवीन अभ्यासक्रम सुरू करून शैक्षणिक दुष्काळ कमी झाल्याचे दिसून येत आहे असे ते आपल्या भाषणातून म्हणाल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी होरायझन ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांची उधळण केली त्यात संस्कृती ही थीम असलेले सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गणेश वंदना,गोंधळ,शिवतांडव,गरभा, दांडिया, महाभारत,दिंडी,छत्रपती शिवाजी महाराज,व देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले नृत्य बघतांना मान्यवर सभासद पालक वर्ग तसेच पत्रकार बांधव मंत्रमुग्ध झाले होते.विद्याथ्यांच्या कलागुणांचे प्रमुख पाहुण्या समाजसेविका सौ अंजुमताई कांदे,संचालक इंजि अमित पाटील यांनी कौतुक केले.


वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक समाधान पाटील, माजी.नगराध्यक्ष शिवाजीराव पाटील,मविप्र सभासद विश्वास कवडे,विजय काकळीज,प्रभाकर कवडे,संजय कदम,सुनिल बोरसे,सुदामराव काळे,दत्तात्रय काकळीज,विठ्ठल आहेर,बाळासाहेब कदम,शरद पगार,विनायक आहेर,गंगाधर थेटे,तसेच डॉ.प्रवीण निकम,सिद्धार्थ पवार,विशाल वडघुले दिनकर पाटील राजेश पाटील,डॉ.गणेश चव्हाण,प्रा.रविंद्र सुरसे,राजाराम गवांदे, नांदगाव महाविद्यालय प्राचार्य डॉ.भवरे,होरायझन ॲकॅडमीच्या प्राचार्या पुनम.डी मढे
आदी सह सभासद, पालक व पत्रकार बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सांस्कृतिक महोत्सवाचे सुत्रसंचालन शिक्षिका अनुराधा खांडेकर,सिताराम पिंगळे,सुवर्णा सोनवणे,शरयू आहेर यांनी केले तर आभारप्रदर्शन शालिनी गोयल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर प्रतिनिधी यांनी मेहनत घेतली.


फ़ोटो ओळ
नांदगांव ता. येथील होरायझन इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलनात नृत्याविष्कार सादर करताना विद्यार्थिनी
.



