ताज्या घडामोडी
Trending

महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या नांदगाव तालुकाध्यक्षपदी वाल्मिक गोराडे तर कार्याध्यक्षपदी विजय चव्हाण यांची निवड

आमदार सुहास कांदे यांनी केले अभिनंदन

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव / बाणगाव बुद्रुक ता.०६ महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघच्या नांदगाव तालुकाध्यक्षपदी वाल्मिक गोराडे तर कार्याध्यक्षपदी विजय चव्हाण यांची निवड करणंआली
येथील शासकीय विश्रामगृहात नांदगाव तालुका कार्यकारिणीची निवड पोलिस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष अरुण बोडकेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य उपाध्यक्ष संपत जाधव,राज्य संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार,जिल्हा सचिव रविंद्र जाधव,जिल्हा उपाध्यक्ष अनिल गडाख,बबन बेंडकुळे,चांदवड तालुकाध्यक्ष हिरामण देवरे,मनमाड माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह नांदगाव येथे उत्साहात पार पडली.
नांदगाव तालुका अध्यक्षपदी बाणगावचे खुर्द चे पोलीसपाटील वाल्मिक गोराडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तालुका कार्यकारणी नांदगाव पुढील प्रमाणे कार्यध्यक्ष,विजय चव्हाण
उपाध्यक्ष,भगवान गरड व कल्पना वाघ,सचिवपदी गणेश मोहिते
सहसचिव-परशराम खंबायत,खजिनदार-विजय चव्हाण
संघटक-मीराबाई भुसारे,प्रमिला पाटील महिला प्रतिनिधी -अनिता झेंडे व चेतना चव्हाण सदस्य-राजेंद्र सोनवणे तर मनमाड पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यकारणी निवड हॉटेल ग्रीन थिंक मनमाड येथे पार पडली.यात मनमाड अध्यक्षपदी दादासाहेब नाईकवाडी उपाध्यक्ष- निलेश जाधव कार्यअध्यक्ष-रंगनाथ धीवर सचिव-भाऊसाहेब पाटील
संघटक-किरण आंधळे अरुणा पवार महिला प्रतिनिधी-स्वाती काळे व मीनाबाई काळे यांची सर्वानुमते तीन वर्षासाठी निवड करण्यात आली.नाशिक जिल्हा संघाच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला संघटना बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे पोलीस पाटील सघाच्या ध्येय धोरण वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन अध्यक्ष अरुण बोडके व राज्यउपाध्यक्ष संपत जाधव,जिल्हा उपाध्यक्ष बबन बेंडकुळे,हिरामण देवरे यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बाभूळवाडीचे पोलीस पाटील मीराबाई भुसारे व नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष वाल्मिक गोराडे यांचा व नांदगाव तालुक्यातील सेवानिवृत्त पोलीसपाटील बाळासाहेब पाटील,बाबासाहेब पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान करण्यात आला.
नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार आमदार सुहास कांदे यांच्याकडून सत्कार करण्यात आला नवनिर्वाचित पदाधिकारीना जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे,आमदार सुहास कांदे शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे,नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजीसभापती तेज कवडे, जिल्हा मंजूर संघाचे अध्यक्ष प्रमोद भाबड यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघ नाशिकच्या वतीने अभिनंदन केले यावेळी माजी पोलीस पाटील बाबुराव पाटील,संजय राठोड,प्रभाकर शिंगाडे,राजेश मोरे, नवनाथ गायके,श्रीमती गंगासागर येरम,शुभांगी राठोड,गंगाधर जाधव,बाबासाहेब कोळी,चन्द्रकांत निकम आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिल्हा सचिव रविंद्र जाधव यांनी केले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.