ताज्या घडामोडी

नांदगावला चोरट्याला नागरिकांनी पकडले

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव, ता. ८ शहरातील बाजारपेठेत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकाच्या घुसून चोरी करणाऱ्या एका संशयितास पकडले आहे. ज्योतिप्रसाद अग्रवाल यांच्या जागरूकतेने चोराला पकडण्यात आले. संशयित सोयगाव भागातल्या डिके चौकातील आहे .पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.रविवारी ता.०९ रोजी सायंकाळी पाचच्यादरम्यान रविवारी दुकान बंद असल्याने श्री.अग्रवाल दुकानाला खेटूनच असलेल्या निवासस्थानी टीव्ही बघत होते.त्यांच्या पत्नी मीनाबाई यांना एक माणूस घरातील कपाटाच्या ड्रॉवरमधील पैसे त्याचे पँटच्या खिशात भरताना दिसल्याने त्या जोरात ओरडल्याने ज्योतिप्रसाद बाहेर येताच त्यांना एक जण जिन्याने खाली उतरताना दिसला.तेही ओरडले.त्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांनी पळून जाणाऱ्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.