ताज्या घडामोडी

वन्यजीव सप्ताह निमित्ताने नांदगावमध्ये वनविभागाची मोटार सायकल रैलीतुन काय साध्य केले?

गर्जा महाराष्ट्र 24 न्युज वृत्तसेवा
मारुती जगधने
नांदगांव : ता .०९ वन्यजीव सप्ताह (Wildlife Week) एक विशेष सप्ताह आहे ज्यात वन्यजीवनाच्या संरक्षणाच्या गोष्टींना लोकांना सांगण्यात येतात.वनविभागाची मुख्य जबादारी आहे की वन्यजीवनाच्या संरक्षणाच्या कामामध्ये लोकांना शिकवायला आणि संचित कार्यक्रमे आयोजित करण्यात मदतीस करण्यात आनंदित होण्यात येते. या सप्ताहाच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये वन्यजीवनाच्या संरक्षणाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा,शिक्षण,प्रदर्शनी,आणि अन्य सविकास क्रियाकलापे समाविष्ट केली जातात. या सप्ताहाच्या द्वारे वन्यजीव संरक्षणाच्या द्रुष्ट्रीने दुष्काळी स्थितीत पाण्याचे तळे उभारणे,त्यांना शिकारी पासून वाचविने यासह वन्यप्राण्याला पासून नागरी वस्तीला होणारे उपद्रव थांबविने या बाबींची गरज असताना नांदगांव येथे वन्यजीव सप्ताहा निमित्ताने काढलेली मोटार सायकल रँलीने वायु आणी ध्वनी प्रद्रुषनात भरच पडली.बरे झाले काही शाळेवर जाऊन चिमुकल्यांना थोडेफार मार्गदर्शन केले.व महाराष्ट्र शासन वनविभाग पूर्वभाग नासिक,उपविभाग मनमाड,वनपरिक्षेत्र नांदगाव वन्यजीव सप्ताह निमित्ताने सहाय्यक वनसंरक्षक अक्षय म्हेत्रे वनपरिक्षेत्र अधिकारी नांदगाव सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सप्ताह मध्ये अनेक गावातील शाळा,कॉलेज,ग्रामपंचायत,येथे विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन कार्यालयामध्ये वन,वन्यजीव,वन्यप्राणी विषयक माहिती व सर्प विषयी समज गैर समज बद्दल जनजागृती कार्यक्रम घेऊन आज दिनांक ७/१०/२०२३ रोजी नांदगाव वनपरिक्षेत्र कार्यालय आवारातून मोटार सायकल रॅली काढून परिसरामध्ये वन,वन्यजीव,वन्यप्राणी विषयी जनजागृती करून हिंगणवाडी येथील जि.प.शाळेतील मुलांना वन्यप्राणी,वन्यजीव विषयी माहिती देण्यात आली माञ नागरी वसाहतीमध्ये नेहमीच साप निघत असतात आशा वेळी वनविभागाची कोणतीच मदत नागरीकाना मिळत नाही.नागरीक सर्प मिञाना पाचारण करता त्यांना खर्च द्यावा लागतो वनविभागाने सर्प पकडण्यासाठी स्वतंञ टिंम नेमनुक केली पाहिजे.त्यामुळे सर्पाला जीवदान तरी मिळेल.सर्प मिञांच्या भरवशावर सर्प पकडण्याची जबाबदारी कितपत योग्य आहे ती एक समाजसेवा आहे .पण वनविभागाची जबाबदारी काय? हिंगणवाडी येथील प्राथमिक शाळेवर मार्गदर्शन प्रसंगी वनपरिमंडळ अधिकारी सुनिल महाले,वनपाल मगण राठोड,वनरक्षक संतोष दराडे, संजय बेडवाल,पाटील मेजर,अमोल पवार, विष्णू राठोड, नवनाथ बिन्नर, शिंदे, शिक्षक वृंद व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते।

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.