ताज्या घडामोडी

जे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचे ते केले युवा फाउंडेशनच्या युवकांनी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता १ सध्या शहरातून राज्यमार्ग व हायवेवर बंगलोर हायवे लिंकची वळविण्यात आलेल्या वाहतुकीमुळे मोठी कोंडी होत आहे आज धनेर येथील पन्नास वर्षीय महिलेचा येवला रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला या पार्श्ववभूमीवर येथील युवा फाउंडेशनच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यायला हवे त्या विभागाकडून दिशादर्शक अजूनही लागले नाहीत मात्र युवा फाउंडेशनने एक पाऊल पुढे उचलत आज वाहनधारकांसाठी फलक लावलेत
मालेगाव रोड वरील मविप्र विद्यालय,महाविद्यालय व प्राथमिक शाळा दवाखाने बँक आदी ठिकाणी वेगवान वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता गृहीत धरून वेग नियंत्रणावरील उपाययोजनांना चालना देण्याची आवश्यकता आहे येथील युवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याबाबतचे निवेदन सादर केले अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व हायवेच्या प्राधिकरणाकडून दिशादर्शक फलक लागलेले नसल्याकडे युवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या निवेदनात लक्ष वेधले आहे युवा फाउंडेशनचे संस्थापक सुमित सोनवणे व त्यांचे सहकारी केवळ निवेदन देऊन थांबले नाहीत तर त्यांनी मविप्रच्या महाविद्यालयातील प्रमुख चौकात शहरात दाखल होणाऱ्या वाहनचालकांसाठी स्वखर्चातून जनजागृतीसाठी फलक लावून वेग नियंत्रण व अन्य बाबत काळजी घेण्याच्या सूचनावजा विनंती करणारे फलक लावलेत आधी केले मग बोलले या उक्तीला धरून युवा फाउंडेशनने संभाव्य अपघाताबाबत जनजागृतीचा केलेला प्रयत्न नागरिकांच्या दृष्टीने कौतुकास पात्र ठरला आहे
मनमाड येथे पूल कोसळल्यामुळे मनमाड शिर्डी पुणे वाहतूक संपूर्ण नांदगाव कडून वळविण्यात आली आहे व गेल्या दोन तीन दिवसापासून शहरातून प्रचंड प्रमाणात भरधाव घेणारी अवजड वाहनांचे प्रमाण वाढले आहे शहरात आज येवला रस्त्यावर अवजड वाहनाच्या धडाक्यात एक निष्पाप महिला बहिणीला आपले प्राण गमवावे लागले आहे व भविष्यात काही काळ ही वाहतूक शहरातून अशाच प्रमाणात ये-जा करणार आहे शहरात रस्त्या लगत महाविद्यालय/विद्यालय व रहिवासी वस्त्या आहेत सदर वाहतुकीला कुठे तरी प्रशासनाच्या वतीने शहर परिसरात वेग नियंत्रण फलक परावर्तित मार्ग फलक दिशा दर्शक फलक लावण्यात यावेत जने करून भविष्यात जिवितहानी टाळता येईल…अशी मागणी युवा फाउंडेशनच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.