ताज्या घडामोडी

विरोधी गटाचेही उपोषण मात्र सरपंच वैशाली पवार सलग चौथ्या दिवशीही उपोषणावर ठाम

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता १ ग्रामसेविकेचा अतिरिक्त देण्यात आलेला पदभार काढून घ्यावा या मागणीसाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या मंगळणे येथील महिला सरपंच वैशाली पवार यांचे उपोषण आजही सलग चौथ्या दिवशी सुरूच होते दरम्यान उपोषणार्थी सरपंच वैशाली पवार ह्या प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी उपोषण करीत असल्याचा आरोप करत गावातल्या दुसऱ्या गटाने जुन्या तहसीलजवळ वेगळे लाक्षणिक उपोषण करीत ग्रामसेवकाची बदली करू नये अशी मागणी लावून धरली तर गेल्या चार दिवसापासून बेमुदत उपोषण करणाऱ्या सरपंच वैशाली पवार ह्या आजही आपल्या मुद्दयांवर ठाम राहिल्यात दरम्यान सरपंच वैशाली पवार यांच्या उपोषण अर्जातील मुद्द्यांच्या आधारे ग्रामविकास अधिकारी विजयकुमार ढवळे यांनी गुरुवारी गावात जाऊन चौकशी करीत काही सदस्य व ग्रामस्थांचे जबाब नोंदवून घेत आपला चौकशी अहवाल गटविकास अधिकारी श्री दळवी याना सादर केला या अहवालात चौकशी अधिकारी ढवळे यांनी सरपंच वैशाली पवार यांच्या तक्रार अर्जात तथ्य नसल्याचा ठपका ठेवत विविध मुद्द्यांचा उल्लेख करीत त्यांनी सरपंच वैशाली पवार यांचे उपोषण बेकायदेशीर असल्याचा उल्लेख आपल्या अहवालात केला एकूणच मंगळणे गावातील उपोषण प्रकरणाला आज वेगवेगळे पदर लाभले तर जुन्या तहसील जवळ संजय पाटील यांच्यासह काही सदस्य व ग्रामस्थांनी सरपंच वैशाली पवार यांच्या विरोधात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले हे उपोषण सांयकाळी मागे घेण्यात आले असले तरी नव्या पंचायत समितीसमोर सरपंच वैशाली पवार यांचे आजही चवथ्या दिवशी उपोषण सुरूच होते जोवर ग्रामसेविकेकडं असलेला गावाचा तात्पुरता सोपविण्यात आलेला पदभार काढला जात नाही तोवर उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करीत आपले उपोषण सुरूच ठेवले आहे दरम्यान लोकशाही धडक मोर्चाचे नेते शेखर पगार यांनी पंचायत समितीची यंत्रणा संशयास्पद वागत असल्याचा आरोप केला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.