ताज्या घडामोडी

नांदगावला मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू;

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगांव / बाणगाव बुद्रुक ता.०१ मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून नांदगांव च्या जुन्या तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी ता (०१) रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात शहर व परिसरातील सकल मराठा तरुण बांधव सहभागी झाले आहे.

आज साखळी उपोषणाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या प्रमुख मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे.राज्य सरकारने मराठा आरक्षण बाबत सकारात्मक निर्णय घेऊन मराठा आरक्षण जाहीर करण्यात येईल असे ठोस आश्वासन देण्यात आले होते सदर आरक्षण कार्यवाहीस योग्य गती मिळून मराठा आरक्षण जाहीर होण्यासाठी एक डिसेंबरपासून राज्यभर साखळी उपोषण करण्याची हाक मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती.त्यानुसार नांदगांव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.मराठा नेते मनोज जरांगे पाटील सूचना करतील,त्यानुसार हे आंदोलन सुरू पुढे नेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.साखळी उपोषणाला आज अनेकानी भेटी दिल्या आहेत ,

जिल्हा उपाध्यक्ष भास्कर झालटे,तालुकाध्यक्ष,भीमराज लोखंडे,कार्याध्यक्ष विशाल वडघुले,मनमाड शहर अध्यक्ष विष्णू चव्हाण, यांसह समाजबांधवांनी सकाळीपासून साखळी उपोषणाला सुरवात केली आहे.या उपोषणाला तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे.उपोषणस्थळी अनेक राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना आदींनी येऊन उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे

प्रतिक्रिया….

मराठा आरक्षण मागणी बाबत राज्य सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास २४ डिसेंबर २०२३ नांदगांव तालुक्यातुन हजारो सकल मराठा समाज सेवक व मराठा आरक्षण समर्थक मुंबई त रवाना होणार आहे

विशाल वडघुले… – उपोषणकर्ते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.