ताज्या घडामोडी

नांदगाव शहरातील वाढती रहदारी नियंत्रित करण्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांचे यंत्रणेला आदेश…

पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथ मोकळे करण्याची नागरिकांनीची मागणी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगांव ता.०२ मनमाडला येवला रस्त्यावरील रेल्वे उड्डानपूलाची भिंत कोसळल्यामुळे मनमाड – येवला मार्गावरील वाहतूक बंद केल्यामुळे मनमाड- शिर्डी – पुणे,- छत्रपती संभाजीनगर- चाळीसगांव – धुळे या मार्गावरील वाहतूक नांदगावच्या दिशेने जात आहे. गत चार दिवसापासून नांदगांव शहरातून प्रचंड प्रमाणात अवजड वाहनाचा ओघ वाढला असून या वाढत्या रहदारी मुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे ,शुक्रवारी ता.०२ रोजी येवला रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी ता.०३ रोजी आमदर सुहास आण्णा कांदेंनी यांनी तातडीची बैठक बोलावून सर्व यंत्रणेला रहदारी नियंत्रणान करण्याचे आदेश दिले आहे.

आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या सूचनेनुसार नांदगाव येथील स्व बाळासाहेब ठाकरे सभागृहात नांदगाव शहरातील वाढत्या रहदारीवर उपाय योजना करण्यासाठी तातडीची बैठक घेण्यात आली.या वेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत सांगितले की वाढत्या रहदारीचा नागरिकांना त्रास होऊ नये,कोणताही प्रकारचा अपघात होऊ नये, ही रहदारी तत्काळ नियंत्रित करावी,मनमाड येथील पडक्या पुलाचे काम लवकरात लवकर करून घेण्यात येईल या साठी मी स्वतः प्रयत्न करीत आहे. नांदगांव शहरातील वाढत्या रहदारीवर यंत्रणेने तत्काळ उपाय योजना करण्याच्या सूचना यावेळी आमदर सुहास आण्णा कांदे यांनी अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिल्या.

यावेळी बैठकित उपस्थितांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवणे,रस्त्यावरचे खड्डे तात्काळ बुजवावे येवला रस्त्यावर जागोजागी खराब रस्ता तात्काळ,दुरुस्त करावा, वळणाच्या रस्त्यावर बोर्ड लावणे,रस्ता चौफुली वर गावांचा नावाचा बोर्ड लावणे,मालेगाव रोड ते साकोरा रोड,व येवला रस्त्यावर पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथ मोकळे करून देण्यात यावे,रेल्वे भुयारी मार्गानी ट्रॅक्टरची वाहतूक बंद करणे शहराच्या बाहेरून जाणाऱ्या नियोजित बायपास चे काम करावे,पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने त्वरित रहदारी जास्त असलेल्या ठिकाणी रहदारी नियंत्रित करण्यासाठी आपले कर्मचारी नेमणूक करावी

यावेळी यावेळी पोलीस निरीक्षक प्रतिम चौधरी यांनी सांगितले की पोलीस प्रशासनाच्या वतीने जागोजागी रहदारी नियंत्रनासाठी जनजागृती चे फलक जागोजागी लावण्यात आले आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कडे रस्त्यावरचे खड्डे बुजवणे,पुलावर संरक्षण कथाडे बसविणे साठी चे मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे तसेच रहदारी नियंत्रणासाठी कर्मचारी नेमणूक करून देणार आहोत नगरपालिका प्रशासनाच्या वतीने रहदारी नियंत्रण साठी स्टेट बॅंकेच्या जवळ कर्मचारी नेमणूक करणार असल्याचे अरुण निकम यांनी सांगितले.

आमदर सुहास आण्णा कांदेच्या कार्यालयाच्या मार्फत रहदारी नियंत्रण जनजागृतीपर सूचना देणारी रिक्षा शहरात फिरत असून १० ठिकाणी जनजागृती चे डिजिटल बोर्डे लावण्यात आले आहे

या बैठकीत,पोलीस निरीक्षक चौधरी,नायब तहसिलदार चेतन कोनकर सार्वजनिक बांधकाम खात्याचे श्री निकम राष्ट्रीय महामार्गाचे सुपरवायझर हर्षल चौधरी,नांदगाव नगरपालिकेचे अरुण निकम,मंडळ अधिकारी योगेश पाटील,माजी सभापती विलासराव आहेर,विष्णू निकम,डॉ.सुनील तुसे, सुधीर देशमुख,अमोल नावंदर,सागर हिरे सुनील जाधव,रमेश काकळीज, पोपट सानप,बापूसाहेब जाधव,भैय्या पगार समाधान पाटील,डॉ.प्रभाकर पवार,भारत पारख,शशी सोनवणे,राजेंद्र पवार,प्रकाश शिंदे,मुज्जू शेख, मयूर लोहडे,पत्रकार,उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.