मंगळणेच्या सरपंच वैशाली पवार यांचे उपोषण सहाव्या दिवशी कायम : ग्रामसेवक संघटनेकडून ग्रामसेविकेच्या बदलीला विरोध

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा
नांदगाव,ता ३ ग्रामसेविकेकडून त्यांना देण्यात आलेला पदभार काढून घ्यावा या मागणीसाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या मंगळणे येथील महिला सरपंच वैशाली पवार यांचे उपोषण आजही सलग सहाव्या दिवशी सुरूच होते दरम्यान उपोषणार्थी सरपंच महिला आपल्या तीन महिन्याच्या लेकरासह बेमुदत उपोषण करीत असल्याने या उपोषणातले गांभीर्य वाढत असल्याने आज ( सोमवारी ) त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे
दरम्यान तालुक्यात ग्रामसेवकांची संख्या मुळात कमी असताना मंगळणे येथील ग्रामसेविके विरोधात असलेले आरोप निष्फळ असून श्रीमती.एच.पी.आहेर यांचेवर कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये तसेच नांदगाव तालुक्यात एकूण ८८ ग्रामपंचायत असून केवळ ३१ ग्रामसेवक कार्यरत असल्याने प्रत्येकाकडे २ पेक्षा अधिक ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार आहे अशा परिस्थतीत मंगळने ग्रामपंचायतीचा कार्यभार दुसऱ्या ग्रामसेवका कडे सोपविणे शक्य होणार नाही म्हणून श्रीमती.एच.पी.आहेर यांची तेथून बदली करण्यात येऊ नये अशी मागणी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्याकडे तालुकाध्यक्ष दिलीप निकम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे याबाबतचे निवेदन ग्रामसेवक संघटनेने ग्रामपंचातीचे विस्तार अधिकारी जे.वी.देवरे याना दिले त्यावर जिल्हा संघटक बिरुनाथ गेंद,तालुका सचिव रवींद्र काकळीज,मानद अध्यक्ष बाळासाहेब सरोदे, ग्रामसेविका हिमगौरी आहेर,उज्वला तुपे, सोनाली गावंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ग्रामपंचायतीच्या नियमित कामकाजाला होत असलेल्या अडचणी बाबत व सरपंच यांनी मासिक सभा व ग्रामसभा बोलावण्यास कसूर केल्याने कलम ३९ नुसार कार्यवाही बाबतचा सर्व अहवाल ग्रामसेविका आहेर यांनी पंचायत समितीला केलेला असून त्यांच्या या अहवालामुळे सरपंच वैशाली पवार व इतरांवर कोणतीही शासकीय कार्यवाही होऊ नये यासाठी त्यांनी ग्रामसेविका यांचेवर खोटे आरोप करत सहा दिवसापासून पंचायत समिती नांदगाव परिसरात उपोषण करीत आहेत असे या निवेदनात म्हटले आहे त्यामुळे ग्रामसेविका श्रीमती आहेर यांची काही एक चूक नसतांना या उपोषणामुळे श्रीमती.एच.पी.आहेर यांच्यासह तालुक्यातील सध्या कार्यरत ग्रामसेवक संवर्गाची नाहक बदनामी होत येत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या निवेदनात करण्यात आला आहे



