ताज्या घडामोडी

नमन एज्युकेशन संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेम्बो इंटरनॅशनलचे अध्यक्ष संजय बागुल व उपाध्यक्षा सौ सरिता बागुल यांना राज्यस्तरीय प्रहार रत्न पुरस्काराने सन्मानित

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल गौरव

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नाशिक ता.०४ शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नमन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष संजय बागुल व उपाध्यक्षा सौ सरिता बागुल यांना दैनिक प्रहार व वृत्तपत्रगरुड झेप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय प्रहाररत्न पुरस्काराने विधानसभाचे माजी उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवळ यांच्या हस्ते नाशिक आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष ना.नरहरी झिरवळ यांची उपस्थिती लाभलेली होती.

गेल्या १३ वर्षांपासून संजय बागुल त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सरिता बागुल हे दोघे जोडपे नांदगांव सारख्या दुष्काळी तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी करत आहेत.त्यांनी नांदगाव येथे लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेम्बो इंटरनॅशनल सीबीएससी स्कूल यांची निर्मिती करत नांदगांव तालुक्यात शैक्षणिक ब्रॅण्ड तयार केला आहे.त्यांनी नेहमी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल या अनुषंगाने शाळेत नवनवीन उपक्रम, तंत्रज्ञान,प्रयोग यांचा वापर करत असतात.शाळेच्या संपूर्ण वेळेत ते नेहमी शाळेत उपस्थित राहून संपूर्ण शाळेकडे,विद्यार्थ्यांकडे,पालकांकडे, शिक्षणाकडे स्वतः जातीने लक्ष देतात.मागील १३ वर्षांपासून त्यांनी दररोज येवला ते नांदगाव प्रवास करून आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी बजावली आहे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देऊन त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेतले आहे.घरातील छोट्या मोठ्या समस्या,लहान मुले आणि आपला संसार यांना न डगमगता प्रत्येक अडचणींनी सामोरे जाऊन त्यांनी ही शिक्षणाची ज्योत प्रज्वलित ठेवली आहे आणि या दाम्पत्याचा हा खडतर प्रवास आज दैनिक प्रहार वृत्तपत्र गरुड झेप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने लक्षात घेऊन त्यांना राज्यस्तरीय प्रहार रत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे.या दोघे पती पत्नी चे शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करत त्यांनी आज समाजासमोर आदर्श ठेवला आहे.त्यांना प्रहार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे,समाजसेविका अंजुमताई कांदे व स्कुल कमिटीचे पदाधिकारी,पालक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.