ताज्या घडामोडी

बाणगाव बुद्रुक ला येवला – नांदगाव रस्त्यावर गतिरोधक बसविण्याचे मागणी

वेगवान वाहनांमुळे नांदगांव येवला रोड ठरतोय अपघाताचा हॉटस्पॉट..

बाणगाव बुद्रुक ता. ०४ गावलगत असलेल्या नांदगांव – येवला रस्ता नुकताच सिमेंट व डांबरीकरनण झालेल्या या रस्त्यावर वाहानांची गती बघून रस्त्यालगत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत रस्ताने पायी जाणाऱ्या -येणाऱ्या १५० च्यावर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनात धास्ती बसली असून. या रस्त्यावर शाळेजवळ व गावाजवळ गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी पालकांच्या सह व नागरिकांनी केली आहे.

बाणगाव बुद्रुक गावातल्या मध्यवर्ती ठिकाणाहुन येवल्याच्या दिशेने गावाकडे वळण रस्ता आहे. रस्त्याच्या लागत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, असून शाळा सुरू होण्यापूर्वी व सुटल्यावर १५० च्यावर विद्यार्थी या रस्त्याने ये-जा करता विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडायला मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्यावर वाहनांचा प्रचंड वेग असतो. रस्ता मोठा असल्याने वाहनांचा प्रचंड वेग व गुळगुळीत रस्ता असल्याने वळण घेणाऱ्या वाहनचालकांनी सावाधगिरीच बाळगणे गरजेचे आहे. या रस्त्याला दुभाजक नसल्याने वाहनधारक बेसिस्तपणे वाहन पास करतांना दिसतात. बाणगाव बुद्रुक बसस्थानक ते टाकळी फाटा हे अर्धा किलोमीटरचे अंतर काही क्षणात वाहनधारक पार करतांना दिसतात वाहनधारकांना गाव आहे की नाही याचेच भान राहत नाही. डांबरीकरण करुन काही दिवस झाले असतानाच या रस्त्यावर दुचाकी स्वारांचे अपघात झाले आहे. अशा प्रकारे अनेकदा लहान मोठे अपघात घडत असुन काहिंना अपघातात आपला जीवही गमवावा लागला आहे. तीन आठवडेपूर्वी वेगवान आलेली मालवाहतूक ट्रॅक वळण घेताना गावाजवळील पुलाच्या कटाडे तोडून नदीपात्रात गेली सुदैवाने जीवित हानी झाली नाही तो तुटलेल्या कठाडे ही अद्याप पर्यंत तुटलेला आहे तोही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दुरुस्त करण्यात आला नाही त्यामुळे या रस्त्यावर भविष्यात अपघातात रोखण्यासाठी या रस्त्यावर लवकरात लवकर गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

दृष्टीशेप…

मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदौर महामार्गावरील रेल्वे ओव्हरब्रिजचा एक भाग कोसळल्याने. वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मालेगाव व येवल्याकडे जाणारी वाहतूक नांदगांव, येवला मार्गे वळविण्यात आली असून या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिणामी, नांदगाव-येवला रस्ता अरुंद असल्याने अवजड वाहनांची संख्या वाढल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे.

महिलेने गमावला जीव….

नांदगाव-येवला रस्त्यावर बेलदारवाडीपासून ते नांदगाव नागरी वस्ती असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली असून ही वाढती रहदारीची उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी हात आहे. दरम्यान वाढलेल्या वाहतुकीने पहिला बळी घेतला असून मल्हारवाडी येथे झालेल्या अपघातात सुनीता जाधव या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

प्रतिक्रिया….

नांदगांव – येवला रस्त्यावर बाणगाव गावाजवळ गतिरोधक नसल्यामुळे वाहनाचा वेग असतो शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरुन रस्ता ओलाडांवा लागतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात या रस्त्यावर गतिरोधक बसवावे, तसेच अरुंद पुलाजवळ व वळणावर, शाळेजवळ वेग मर्यादा दर्शक बोर्ड लावावे, पुलाचे संरक्षण कटाडे बसवावे, तसेच बाणगाव ते नांदगांव दरम्यान रस्त्याच्या मध्ये आलेल्या काटेरी झाडांच्या फांद्या काढाव्यात

बापुसाहेब कवडे – जेष्ठ नेते नांदगांव

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.