कामावर उशिरा आलेल्या लेटलतीफ कर्मचाऱ्यांना बीडीओचां दणका
नांदगाव पंचायत समितीमध्ये लेटलतीफ ७ कर्मचाऱ्यांना नोटिसा

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा
नांदगांव ता.०६ नांदगाव पंचायत समितीतील लेटलतीफ अधिकारी, कर्मचाऱ्यांना, प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी मंगळवारी ता.०५ रोजी कारणे दाखवा नोटिसा बजावत कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.
मंगळवारी (दि. ५) शासकीय कार्यालयाच्या सकाळच्या वेळेत गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी कार्यालयात फेरफटका मारला.त्यावेळी काही कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले.हजेरीपत्रक,हालचाल नोंदवही व उपस्थिती यांची पडताळणी केली असता काही कर्मचारी सकाळी १०.०५ पर्यंत कार्यालयात हजर झालेले नव्हते.फिरतीवर असल्याबाबतची कोणतीही नोंद हालचाल नोंदवहीमध्ये आढळली नाही. हा प्रकार गांभीयनि घेत तात्काळ गैरहजर कर्मचाऱ्यांना सकाळी १०.५ वाजेपर्यंत कार्यालयात का उपस्थित नव्हते तुम्ही फिरतीवर असल्याबाबत हालचाल नोंदवहित नोंद केली नाही.उपस्थितीबाबतचा खुलासा पुराव्यासह एक दिवसात सादर करावा.तुमचा विहित मुदतीत समाधानकारक खुलासा न झाल्यास तुमचे काहीही म्हणणे नाही असे समजून अन्यथा तुमची या दिवसाची अनधिकृत गैरहजेरी विना वेतन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.कार्यालायीन वेळेत गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वर कारवाईचा बडगा उगारल्याने लेटलतीफांचे धाबे दणाणले आहे
प्रतिक्रिया….
कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत व्हावीत,त्यांना पंचायत समितीत वारंवार चकरा मारण्याची वेळ येऊ नये,यासाठी हा कारवाईचा बडगा उगारला.भविष्यात कर्मचारीवर्ग वेळेला महत्त्व देतील,अशी अपेक्षा बाळगतो.
– संदीप दळवी,प्रभारी गटविकास अधिकारी,नांदगाव



