ताज्या घडामोडी

नांदगांव शहरात धाडसी घरफोडी..

घरफोडीतून ५७ हजार लंपास

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता.११ शहरातील लक्ष्मीनगरमधील पवन कासलीवाल यांच्या घरातून पहाटेच्या सुमारास घराचे कुलुप तोडून ५७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील लक्ष्मीनगर मधील रहिवासी पवन कासलीवाल हे बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दोन अंगठ्या, एक लॉकेट,४० ह रु किंमत सोन,व चमचे,निरंजन,समई आदी १७ हजार रुपये किमतीच्या वस्तु अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले असल्याचे आढळून आले.याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.