ताज्या घडामोडी

नांदगाव तालुक्यात दुष्काळी उपाययोजना राबवा : आमदार सुहास आण्णा कांदे

हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांकडे केली मागणी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नागपूर ता. १२ : यावर्षी पुरेशा पावसाअभावी नांदगाव तालुक्यात भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून,तालुक्यातील पशुपालक यांच्याकडील चारा संपल्याने पशुधन वाचविण्यासाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात,तालुक्यातील बाणगाव,भाडीं व न्यायडोंगरी या तीन मंडळांचा दुष्काळाच्या संबंधीच्या उपाययोजनेत समावेश करावा,तालुक्यात हवामान व पर्जन्यमान यंत्रे बसवावीत,अशी आग्रहाची मागणी हिवाळीअधिवेशनात नांदगांव मतदारसंघाचे आमदार सुहासआण्णा कांदे यांनी मंगळवारी (ता. १२) विधानसभेच्या सभागृहात अध्यक्षांकडे केली.

नागपूरला सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा सभागृहात दुष्काळ,अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा झाली. या चर्चेत आमदार कांदे यांनी नांदगाव तालुक्याच्या दुष्काळ पाठोपाठ अवकाळी गारपिटीच्या संकटाने शेतकऱ्यावर ओढवलेल्या संकट व त्याची विदारकता सांगितली.पाऊस नसल्याने विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. महिलांना दोन-दोन मैलांवरून डोक्यावर हांडे घेऊन पाणी आणून शेतातली उभी पिके जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे.एप्रिल,मे मध्ये झालेल्या गारपीठीने तालुक्यातील पिकांचे होत्याचे नव्हते झाले विमा कंपन्यांचा मनमानी कारभार, तालुक्याच्या दुष्काळाची विदारकता सभागृहात आपल्या भाषणातून उभी करताना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी पीक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या वागणुकीबद्दल तीव्र शब्दात आक्षेप घेत विमा कंपन्यांकडून काम काढून घेण्याची मागणी करताना राज्य आणि केंद्राने शेतकऱ्यांसाठी स्वतःची विमा कंपनी सुरु करावी अशी सूचना करताना नांदगाव विधानसभा मतदार संघातील पंचवीस हजार शेतकऱ्यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात दीड वर्षापूर्वी दावा दाखल केला असल्याची माहिती देताना आमदार सुहास कांदे यांनी शासन न्यायालयात हजर होते. मात्र विमा कंपन्यांच्यावतीने एक जणही उपस्थितीत राहत नसल्याने सांगून विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढले,

********

शुक्रवारी निर्णय

■ गेल्या वर्षाच्या दुष्काळासह अवकाळी अनुदान मिळालेले नसून,त्यासह चालू वर्षाचे अवकाळी व दुष्काळ गारपिटीचे अनुदान देण्याबाबत मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी निर्णय घेण्याची मागणी या चर्चेत आमदार सुहासआण्णा कांदे यांनी लावून धरली. या वेळी राज्यातील विविध मतदारसंघांतील आमदारांनी चर्चेत सहभाग घेतला. चर्चेला उत्तर देताना मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी, शुक्रवारी (ता. १५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदगावसह राज्यातील अन्य दुष्काळसदृश तालुक्यांच्या संबंधातून सभागृहात आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे उत्तर सभागृहातील सदस्यांना दिले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.