ताज्या घडामोडी

नांदगावमध्ये स्व : गोपीनाथ मुंडेंना अभिवादन

पदाधिकारी, विद्यार्थ्यांकडून आठवणींना उजाळा

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव, ता. १२: आमदार सुहास कदि यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गटांसह नांदगाव, मनमाड आणि मालेगाव येथील आमदार कांदे यांच्या संपर्क कार्यालयात माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येऊन हा दिन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

या वेळी शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकत्यांनी एकत्र येऊन गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले. भालूर गटातील पानेवाडी, साकोरा गटातील तळवाडे, वेहेळगाव, न्यायडोंगरी गटातील पळाशी, जातेगाव गटातील कासारी या ठिकाणी प्रेरणादिन उत्साहात साजरा करण्यात आला.

नांदगाव येथील संपर्क कार्यालयात देखील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन करीत अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव, संजय देवरे, हरिभाऊ नन्नवरे, सागर खैरनार, बापू जाधव, राजेंद्र कुटे, सोनू गर्वाद, गणेश गांगुर्डे, तान्हाजी पवार, महेंद्र गायकवाड,गणेश हातेकर,मनोज पाटील, निशांत बोडके, गणेश चकोर, भरत पारख, प्रवीण सोमासे,महिला आघाडीच्या रोहिणी मोरे, भारती बागोरे, वैशाली मोरे, रेणुका बहिकर,उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.