ताज्या घडामोडी

शेतकरी सोसायटी शेतजमिनीचे तत्काळ वाटप करा

अनकवाडेचे सभासद, वारसदारांची मागणी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगाव, ता. १२ : अनकवाडे (ता. नांदगाव) येथील शेतकरी सहकारी सोसायटीचे मूळ ३२ सभासद व त्यांच्या वारसांना शेतजमिनी त्वरित वाटप करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता. ११) आम आदमी पक्ष व अनकवाडे शेतकरी सहकारी सोसायटीच्या सभासदांनी जुन्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले.

मौजे अनकवाडे येथील गट नंबर २१/२२/अ/श्व, २२/अ/३, २३,१३६,१३४ अशा विविध गटातील एकूण ३५० एकवरावरील जमीन अनकवाडे सामुदायिक शेती सहकारी सोसायटीला १९६४ ला देण्यात आली होती. मात्र सोसायटी काही कारणांमुळे अवसायनात निघाली.तथापी शेतजमीन वाटपाचा मुद्दा प्रलंबित राहून गेला. ३५ वर्षापासून अवसायनात गेलेल्या शेतजमिनी परत मिळाव्यात म्हणून सोसायटी सभासदांकडून पाठपुरावा सुरु होता. याप्रकरणी जिल्हाधिकारी व येवला प्रांताधिकारी यांनी नांदगावच्या तहसीलदारांना मूळ आदेश देण्यासंबंधी निर्देशित करूनही दस्तऐवज देण्यासाठी महसूल प्रशासनाकडून चालढकल होत असल्याच्या आरोप सभासद यांनी केला.जमीन वाटपाचा तिढा महसूल विभागाला सोडविता येत नसल्याने हतबल अनकवाडे सामुदायिक शेती सहकारी सोसायटीच्या सभासद व त्यांच्या वारसदारांनी येथील जुन्या तहसीलसमोर आमरण उपोषण करीत तहसीलदार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनाची दखल घेत नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांनी आंदोलकांची भेट घेत आठ दिवसाच्या आत शेतजमिन वाटपाबाबतच्या नोंदी असलेल्या मूळ आदेश उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी महसूल अधिकारी योगेश पाटील, आंदोलक आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तम
निरभवणे, विशाल वडघुले, अल्ताफ शेख, अमोल लांडगे, मनमाड शहर आम आदमी पार्टी अरुण धिवर, संदीप सोनवणे, योगेश वाघ, रूपाली डिंबर, वाल्मीक धिवर, पुंजाराम पगारे, मयूर डिंबर, मधुकर धिवर काशिनाथ धिवर, सुनील लोंढे, ज्ञानेश्वर कुनगर, हंसराज घुसळे, भागुबाई धिवर, लताबाई धिवर, अनिता धिवर, चित्रा लोंढे आदी उपस्थितीत होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.