ताज्या घडामोडी

नांदगावला बायपास सर्वेक्षणासाठी २४ लाखांचा नवीन प्रस्ताव

वाढत्या रहदारी मुळे राष्ट्रीय महामार्ग ठरतोय डोकेदुखी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगाव, ता. १४: नांदगांव शहराच्या नियोजित बाह्यवळण रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी पुन्हा एकदा मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला.मनमाड रस्त्यावरील गुरुकुल तंत्रनिकेतनपासून ते साकोरा रस्त्यावर असलेल्या रेल्वेच्या उड्डाणपुलापर्यंत एकूण चार किलोमीटर बाह्यवळण रस्त्यासाठी एकूण २४ लाख रुपये खर्चाचा हा प्रस्ताव आहे.पाच लाख १२ हजार रुपये असा सर्वेक्षणासाठी खर्च होणार आहे.

बाह्यवळण रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी गेल्यावर्षी निधी मिळाला होता. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊन बाह्यवळण रस्त्याच्या प्रकल्पीय आराखड्याचे काम पुढे सरकले असते.आता मात्र,त्याच कामासाठी परत प्रस्ताव पाठविण्याची वेळ महामार्ग प्राधिकरणावर आली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या राज्यमार्ग चे २०१७ मध्ये महामार्गात रूपांतरित झाला. तेव्हा महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्पाय आराखड्यात बाह्यवळणाचा समावेश होणे गरजेचे होते.मात्र,प्रकल्पाची अंदाजपत्रकीय किमतीत वाढ होईल म्हणून प्राधिकरणाने प्रकल्पीय आराखड्यात समावेश केला नव्हता.वाहतुकीच्या वाढत्या वर्दळीवर पर्याय म्हणून बाह्यवळण रस्त्याच्या कामाला सरकारच्या पायाभूत समितीने दहा वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती.तेव्हापासून बाह्यवळणाचा मुद्दा कागदावर अडकून पडला आहे.

■■■■■■
अतिरिक्त वाहतुकीचा ताण

मालेगाव-बेंगळुरू महामार्गाच्या लिंक रोडवरील मनमाड नजीकच्या उड्डाणपुलाचा भरावाचा काही भाग कोसळल्याने वाहतूक नांदगांव मार्गे येवला अशी वळविण्यात आली आहे.वळविलेल्या या वाहतुकीचा अतिरिक्त ताण नांदगाव शहरातील वाहतुकीवर पडला आहे.अगोदरच नवीन महामार्ग तयार झाला असल्याने चांदवड,जळगावकडील वाहतूक महामार्गावरून मोठ्या प्रमाणात सुरू आहे.त्यात अतिरिक्त ताण वाढल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.दररोज १० हजारांहून अधिक वाहनांच्या रहदारीचा रेटा वाढत असून,वाहनांच्या गर्दीतून वाट काढत महामार्गावर वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

◆◆◆◆◆◆

जूनमध्ये केंद्राला प्रस्ताव *****

नाशिक विभागाने गेल्या वर्षों बाह्यवळण रस्त्याच्या प्राथमिक सर्वेक्षणासाठी
तयार केलेला प्रकल्पौय आराखड्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. त्यासाठी मनमाड बाह्यवळण रस्त्याच्या प्राथमिक सर्वेक्षणासाठी ४० लाख रुपये व नांदगावसाठी १९ लाख रुपये अशी तरतूद मंजूर झालो होतो. मात्र,गेल्या वर्षभरात सर्वेक्षणासाठी मिळालेला निधी खर्च झाला नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणावर नव्याने प्रस्ताव पाठवावा लागला.जूनमध्ये बाह्यवळण रस्त्याच्या सर्वेक्षणासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.