ताज्या घडामोडी

नांदगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्नेहल लाड यांची नियुक्ती

गर्जा महाराष्ट्र 24 वृत्तसेवा

नांदगाव ता.१९ येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी श्रीमती स्नेहल लाड यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी गुरुवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला .

या संदर्भात अधिक माहिती अशी की,नांदगाव पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांची धुळे जिल्हा परिषदेत प्रशासकीय बदली करण्यात आली होती.तेव्ह पासून कायमस्वरूपी नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे पद रिक्त होते.तेव्हापासून सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप दळवी यांची प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चांदवड पंचायत समितीच्या परिविक्षाधीन गटविकास अधिकारी श्रीमती स्नेहल लाड यांची नांदगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. गुरुवारी ता.१८ रोजी जानेवारी रोजी स्नेहल लाड यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदाचा पदभार सकाळी १० वाजता स्विकारला.आगामी काळात शासकीय योजनांच्या माध्यमातुन ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकासाचे लक्ष गाठणे हे आपले प्रमुख लक्ष राहणार असल्याचे श्रीमती स्नेहल लाड यांनी सांगितले.यावेळी श्रीमती स्नेहल लाड यांचे स्वागत प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी फुल गुच्छ देऊन केले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.