ताज्या घडामोडी

नाशिक व प्रभू श्रीरामांचे नाते जवळचे : मंत्री डॉ.भारतीताई पवार

जातेगावीं राज्यस्तरीय नरेंद - देवेंद्र पुरस्काराचे मोठ्या दिमाखात वितरण..

गर्जा महाराष्ट्र 24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.२० देशभरात कुठल्याही राज्यात गेल्यावर श्रीरामचंद्रांच्या नावाबरोबर नाशिकचाही जयघोष केला जातो. नाशिकचे नाव घेतल्यावर प्रथम प्रभू श्रीरामांची आठवण काढली जाते. अशा प्रकारे नाशिक व प्रभू श्रीरामांचे नाते जवळचे आहे. म्हणून आपण नाशिककर खूप भाग्यशाली आहोत. अशी भावना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास अण्णा कांदे व्यापारी आघाडीचे आदी मान्यवर उपस्थित जातेगाव येथे श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा महोत्सवनिमित्त ‘ बलिदानी कारसेवकांना अभिवादन व राज्यस्तरीय नरेंद्र – देवेंद्र पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव विधान सभेचे आमदार सुहासआण्णा कांदे, प्रदेशाध्यक्ष वीरेंद्रजी कुकरेजा जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ प्रदेश संयोजक व्यापारी आघाडी नितीन पोकळे,रवी अनासपुरे, केदा आहेर, पंकज खताळ, तहसीलदार डॉ.सिद्धार्थ मोरे, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, गटविकास अधिकारी संदीप दळवी, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तराज छाजेड आदी उपस्थित होते

ना.डॉ.भारतीताई पवार पुढे म्हणाल्या, की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण जन्माला आलो आहोत. या पावन भूमीचा सार्थ मला सार्थ अभिमान आहे. आजही ग्रामीण भागातील वयोवृद्ध मंडळी अभिवादन करण्यासाठी राम – राम म्हणतात. या रामनामाचा संबंध आपल्या संस्कृतीशी जोडलेला आहे. आपले शेकडो वर्षांचे स्वप्न साकार होत आहे. २२ जानेवारीचा दिवस दिवाळीसारखा साजरा करावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. नांदगाव येथील राज्यस्तरीय नरेंद्र – देवेंद्र प्रतिष्ठानचा पुरस्कार भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना प्रदान करण्यात आला. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श संस्था, स्वराज्य संस्था व व्यक्तिनाही सन्मानित केले गेले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सागर फाटे सरचिटणीस उमेश उगले कोषाध्यक्ष विक्रम निकम स्वागत अध्यक्ष ब्रिजेश पाटील सरचिटणीस राजू कदम उपाध्यक्ष देविदास व्यवहारे उद्धव वाघ ज्ञानेश्वर नवले रामेश्वर निकम पुरुषोत्तम पगार सोमनाथ तळेकर विनोद अहिरे राहुल अहिरे संजय भाऊ निकम समाधान शिंदे कृष्णा त्रिभुवन आप्पासाहेब मडके गणेश शेरमाळे अमोल मेंगाळ राजेंद्र गवळी सोमनाथ त्रिभुवन भरत पाटील अमित जैन ज्ञानेश्वरींढे विवेक पवार निलेश चुडीवाल योगेश वाडेकर बाळू काळे हरिश्चंद्र पाटील अर्जुन वर्पे वाल्मीक वरपे नितीन जाधव शिवाजी लाठे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी केले

निर्यातबंदी उठवण्याबाबत सकारात्मक निर्णय.होण्याचे दिला संकेत..

कांदा निर्यातबंदी झाली तेव्हाच आपण वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे .राज्यभरातून शेतकरी व प्रतिनिधींचे मला फोन येत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे . मीही शेतकरी कन्या असून, शेतकऱ्यांनीच मला पहिली महिला खासदार बनविले आहे .भविष्यात कांद्याला चांगला दर मिळण्यासाठी प्रयत्नशील राहिले असे यावेळी डॉ भारतीताई पवार यांनी सांगितले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.