ताज्या घडामोडी
Trending

राज्यात कांद्याचे भाव कोसळल्याने बळीराजा हवादिल

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा : आमदार. रोहित पवार

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
निफाड ता २६ कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र कांदा पिकाचे माहेर घर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्विकडे आहे जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी श्री बोरगुडे यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.व शेतकऱ्यांनी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की,राज्य सरकारने केवळ राजकारण न करता शेतकऱ्यांचे प्रश्नही सोडविण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे. नाफेडने खरेदी केलेला कांदा स्थानिक बाजारपेठेत विक्री न करता परदेशात किंवा बांगलादेशला पाठवावा.राज्य सरकारने केंद्राला पत्र उशिरा पाठवले.त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. बांगलादेशने आयात शुल्क वाढविल्यामुळे कांदा,द्राक्ष पाठविण्यास मोठा मोबदला द्यावा लागतो.केंद्र सरकारने याप्रश्नी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.