मांडवड गारपीठ अनुदान वाटप घोटाळा प्रकरणी ग्रामविकास आधिकऱ्यावर गुन्हा दाखल
ग्रामसेवकाचा थेट बडतर्फचाच प्रस्ताव सादर

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव/बाणगाव बुद्रुक ,ता १ मांडवड येथील ग्राम सेवक सुभाष फत्तू चव्हाण, यांनी मूळ शेतकरी खातेदार यांना डावलून संगनमताने स्वतःचे आर्थिक लाभापोटी शेतकरी खातेदार यांना दिली जाणारी नुकसान भरपाई पोटी दिली जाणारी रक्कम मूळ लाभार्थी यांचे यादीमध्ये त्यांचे आधार कार्ड व बँक खाते क्रमांक न देता स्वतः चे बँक खाते क्रमांक व आधार कार्ड वापरून स्वतःचे नांवाने बँक खात्यात वर्ग करून तीन लाख सत्तावन्न हजार सातशे पन्नास) रुपयाचा शासकीय अपहार केल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याची दखल घेत गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी अपहार केलेल्या ग्राम विकास अधिकाऱ्या विरोधात बडतर्फीचा कारवाई करावी असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविल्याने मोठी खळबळ उडाली आहे अशा प्रकारचा गुन्हा व बडतर्फीची कारवाई चा प्रस्ताव पाठविण्याचा तालुक्यातील पहिलीच घटना आहे ग्राम विकास अधिकारी सुभाष चव्हाण यांच्यासह संगणक परिचालकासह अन्य बारा जणांविरोधात मंडळ अधिकारी श्रीमती सुवर्णा गोडे यांनी फिर्याद दाखल केली गारपिटीचे अनुदानाचा अपहार झाल्याबद्दल मांडवड येथे ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते त्याची दखल घेत तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी मंडळ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली होती त्याचा अहवाल आल्यानंतर अपहार करणारे ग्रामसेवक सुभाष चव्हाण व त्यांना साथ देणाऱ्या अन्य बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नोव्हेंबर-२०२३ मध्ये गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अनुदानामध्ये ही अफरातफर झाल्याचा ठपका ठेवून व गुन्हा दाखल झाला म्हणून ग्रामसेवकाला बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे



