ताज्या घडामोडी

नांदगांव तालुक्यात पावसाने फिरवली पाठ, तालुका दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

हंगाम वाया जाण्याची भिती,चारा व ,पाणीटंचाई ,टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासह चारा छावण्या सुरू करण्याची मागणी...

मारुती जगधने : गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.११ नांदगाव तालुक्यात गत दोन महिण्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने, तालुक्यात जेमतेंम पावसावर बळीराजाने केलेल्या खरीप पेरण्याची पिके दोन महिण्यापासुन पाण्याअभावी सुकली असून आता त्यांच्या वाती होऊ लागल्या तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पिण्याचे व वापराचे पाणी संपुष्टात आले आहे शासन स्तरावर मांडवड गांवात दुष्काळ जाहीर करुण जनावरांच्या चारा छावण्या सुरु कराव्या, दुष्काळी अनुदानची मदत करावी यासह विविध मागण्या निवेदनाव्दारे मांडवडच्या शेतकऱ्यांनी नांदगांव तालुका तहसीलदारांना व, तालुका कृषी अधिकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे तसेच. दुष्काळसद्रुष्य परिस्थितीचा शासन स्तरावर मांडवड गावाची पहाणी करावी अन्यथा येत्या काही दिवसात मागण्यासाठी उपोषनाचा निर्धार निवेदनाव्दारे केला आहे.

तालुक्यातील मांडवड येथील शेकर्यांनी केलेल्या मागणीत म्हंटले आहे की तालुक्यात प्रामुख्याने दोन महिण्यापासून पाऊस नाही पेरणी केलेली खरीप पिके मका, बाजरी, सोयाबिण, कपाशी, कडधान्य, तेलबिया, तृनधान्याची पिके आता सुकून वाती होत आहे सततच्या जोराच्या वाऱ्याने बागायती पिके देखील कोरडी झाली तसेच लागवडीला आलेले कांदा रोपांना लागवडीला पुरेसे पाणी विहीरीना नाही आता कांदा रोपे देखील सुरकत्या होत आहे. महागडी बियाने वाया जाण्याची वेळ आली आहे. जनावरांना चारा शिल्लक नाही रानात देखील गवत नाही त्यासाठी जनावरांच्या चारा छावण्या सुरु करा, पाण्याचे टँकर सुरु करा मांडवड, आझादनगर येथील शेतकऱ्यांचे सन २२/२३ चे अतिवृषटि व गारपिट चे अनुदान प्राप्त करुन द्यावे, संगठने, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाचा संयोजन आवश्यक आहे. या प्रक्रियेतील स्थायिता, संरक्षण, आत्मनिर्भरता आणि सामाजिक संवाद महत्वपूर्ण घटकांचा यात समावेश करावा व दुष्काळाला समोरे जाण्यास आम्हाला सहकार्य करावे अशी आशा शेतकरी करीत आहे.


गारपिट चे अनुदान प्राप्त करुन द्या, वंचित शेतकर्यांना देखील अनुदान उपलब्ध करु द्या, दुष्काळी अनुदान द्या २, तंत्रिक अडचणीमुळे प्रधान मंत्री योजनेचा १३ वा व १४ वा हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळण्यासाठी नोडल अधिकारी नेमणूक करून अनुदान प्राप्त करुन द्या, दुबारा पेरणीसाठी मोफत बियाने व कृषीनिवीशा उपलब्ध करुन द्या, मांडवड कृषी सहाय्यकाने वगळलेले शेतकर्यांना पंचनामे करुन अनुदान मिळावे,२५ आगस्ट पर्यंत अनुदान वितरणासह अन्य मागण्या पूर्ण करावी अन्यथा मांडवडचे सर्व शेतकरी उपोषनाचा मार्गाने आंदोलन करु असा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जेष्ठ नेते विठ्ठल (आबा) आहेर,सरपंच अंकुश डोळे,आनंत (भैय्या) आहेर,अशोक निकम उमाकांत थेटे,सर्जेराव थेटे, संजय निकम,विजय आहेर, सागर आहेर, उदय पाटील, मन्सुरीअकील, गोकुळ गडाख, शंकरराव थेटे,नाना काजळे, महेश मोहिते,सुधीर काजळे,सागर गडाख,आम आदमी पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष विशाल वडघुले,संपतराव थेटे, जिभाऊ माळी तसेच शेकडो ने ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.