ताज्या घडामोडी

अवघी दुमदुमली पंढरी…

आषाढी यात्रेसाठी पंढरीत १० लाखांवर वैष्णवांची मांदियाळी

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा

पंढरपूर ता.२९ सावळ्या विठ्ठलावर असणाऱ्या श्रद्धेपोटी शेकडो किलोमीटर पायपीट करून अपार यातना झेलून पंढरीत आलेल्या लाखो भाविकांनी भूवैकुंठ पंढरीची दिवाळी गजबजून गेली आहे.आषाढी यात्रेसाठी पंढरीत १० लाखांवर वैष्णवांची मांदियाळी जमली असून शुक्रवारी यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.पाऊस नसल्याने वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.
आषाढी यात्रेसाठी बुधवारी पंढरीत संत ज्ञानेश्वर माउली,संत तुकाराम महाराज,संत मुक्ताबाई,संत निवृत्तीनाथ,संत सोपानकाका,रुक्मिणी माता अशा मानाच्या पालख्यांसह इतर संतांचे शेकडो पालखी सोहळे,हजारो दिंड्या दाखल झालेल्या आहेत.पंढरीच्या चारही दिशांनी वैष्णवांची गर्दी झाली आहे.चंद्रभागा वाळवंट,६५ एकर मैदान,दर्शन रांग,विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग वारकऱ्यांच्या गर्दीने,टाळ,मृदंगाचा गजर आणि भजन,कीर्तनाने.भारावून गेला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.