ताज्या घडामोडी

दिंडोरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ.भारतीताई पवार यांना भरघोस मताती विजयी करा : जेष्ट नेते बापूसाहेब कवडे

गर्जा महाराष्ट्र 24 वृत्तसेवा

बाणगाव बुद्रूक ता.15 देशात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी विकासाची गंगा आणली.आहे ही निवडणुक विकासाच्या मुद्यावर निवडणुक न लढविता विरोधक त्याला जातीयतेचा रंग देत आहेत. अशा भुलथापांना बळी न पडता डॉ भारतीताई पवार यांनाच भरघोस मतांनी विजयी करुन जिल्ह्याच्या विकासाला चालना द्या.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा असे आवाहन ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी दिंडोरी लोकसभा मतदासंघांचे महायुती व घटक पक्षाच्या उमेदवार डॉ भारती ताई पवार यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता.१४) सायंकाळीं बांणगाव येथील सभेत बोलताना केले.

यावेळी ज्येष्ठ नेते बापुसाहेब कवडे म्हणाले,देशात मोदी सरकारने कित्येक वर्षाचा राममंदिराचा प्रश्न सोडवत अयोध्येत श्री राममंदिर उभारले आहे देशातील ८० कोटी गोरगरीब जनतेला मोफत रेशन दिले जाते.देशातील शेतकऱ्यांच्या प्रत्येक वर्षाला खात्यात ६ हजार येत आहे.१८ लाख गोररिबांना घरे मिळणार आहे तसेच, जलजीवन मिशन अंतर्गत घरघरात पिण्याच्या पाणी येणार आहे, गोरगरिब कुटुंबाला आयुष्मान भारत योजना अंतर्गत मोफत उपचार सुरू आहेत तसेच राज्य सरकारच्या निर्णयामुळे मोठ्या संख्येने कुणबी प्रमाणपत्र जिल्ह्यात दिले आहेत.आमदार सुहास आण्णा कांदे यांनी बाणगावला कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहे व काही कामे सूरू आहे आमदार सुहास कांदे म्हणुन व गावतील झालेली विकास कामे म्हणुन व आगामी ५ वर्षात दिंडोरी मतदरसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व नार पार योजना अंबलबजावणी साठी डॉ.भारती ताई पवार यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन केले त्यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते सजन तात्या कवडे,यांनीही डॉ. भारतीताई पवार यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले.यावेळी,यावेळी माजी सभापती तेज कवडे, ग्रामपंचायत,सोसायटीचे पदधिकारी व बाणगाव बुद्रूक व बाणगावं खुर्द गावातील युवक व नागरिक मोठया संख्येने उपस्थिती होते.

फोटो ओळ
बाणगाव बुद्रूक / दिंडोरी लोकसभा मतदासंघांचे महायुती व घटक पक्षाच्या उमेदवार डॉ भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता.१४) सायंकाळीं बांणगाव येथील सभेत बोलताना ज्येष्ट नेते बापूसाहेब कवडे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.