नांदगावला म.सा.प. शाखेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा जरा

गर्जा महाराष्ट्र २४न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.०४ मराठी भाषा ही समृद्ध आहे.आजच्या काळात मुलांच्या मनात मराठी भाषेचे प्रेम रुजविण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी मराठी भाषा प्रेमींनी प्रयत्न करणेची आवश्यकता आहे.असे प्रतिपादन सटाणा येथील शेतकरी कवी शैलेश चव्हाण यांनी नांदगाव म.सा.प.शाखेच्या कार्याचे कौतुक केले.ते मराठी साहित्य परिषद शाखा नांदगाव येथील साहित्य परिषदेच्या हनुमान नगर येथील कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी या शाखेच्या कार्यालयात विवीध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती शाखेचे कार्यवाह कवी व गझलकार काशिनाथ गवळी यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले.महिन्याच्या दुसऱ्या रविवारी बालकांना मराठी साहित्य ओळख करून दिली जाणार आहे.यासाठी विविध कवींच्या कविता,कथासंग्रहातील कथा,नाट्य वाचन,तसेच जिल्ह्यातील विविध साहित्यिकांची ओळख शाखेतुन दिली जाणार आहे.भाषाअधिक समाजाभिमुख होण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले. काशिनाथ गवळी यांना नुकत्याच ११ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक येथे पार पडलेल्या एक दिवसीय गझल संमेलनात गझल क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल’गझलयात्री पुरस्कार २०२४’देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.तसेच उपक्रमशिल शिक्षिका सौ.अलका नारायणे यांना महिला दिनाच्या निमित्ताने वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ.महेंद्र देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.म्हणून या दोघांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.सुरेश नारायणे होते त्यांनी वर्षभरात म.सा.प.शाखेने राबविलेल्या उपक्रमांचा व कार्यक्रमाचा आढावा घेतला.शिवा अहिरे,ग्रामपंचायत सदस्य सचिन आहेर,रमेश घोडके,हर्षद नारायणे, मुन्नाभाई कादरी,व आदी म.सा.प.सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.