नागाला जीवदान.

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा
: मारुती जगधने प्रतिनिधी
नांदगाव ता.१९ सध्या पावसाळा सुरु झाल्याने बिळात पाणी साचत असल्याने सरपटनारे प्राणी जमिनच्या वर येऊन सुरक्षित जागा शोधू लागले यातील एक कोब्रानाग श्रीरामनगरातील. नांदगांव येथील विश्वनाथ पाटील यांच्या घरातील जिण्यातुन घरात घुसला हे एका तिन वर्षाच्या चिमुकलीने बघितले ती धावत धावत आजीकडे जाऊन बोबड्या शब्दात बोलू लागली आजी आपल्या घलात साप आला तो बघताच कुटुंबातील सर्वच नागाला पाहून घाबरले .यावेळी त्यांनी हिंमतीने समोर उभे राहून सापाला घरात येण्यापासून रोखले तो नाग अत्यंत चपळ आणी फुत्कार …करीत फना काढून जिण्याच्या पायरीवर थांबला होतो भुरकट तांबडा रंगाचा नाग अगदी चमकदार दिसत होता.त्याला कसेबसे थांबुन धरत …या वेळेला सर्पमिञ मंगेश आहेर यास पाचारण केले तो १५ मिनिटात तेथे पोहचला सर्पमिञाने अत्यंत चपळाईने नाग पकडून त्याला सुरक्षित स्थळी जंगलात सोडला




