बाणगाव बुद्रुक येथे जि.प.शाळेत नवीन वर्गखोली बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.२० तालुक्यातील बाणगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या नविन वर्गखोलीचे भूमिपूजन जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपसरपंच वैशाली कवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
नांदगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बाणगाव बुद्रुक येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा असून या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत व या शाळेत १००च्यावर विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र सदर शाळेची इमारत जीर्ण झाल्याने निर्लेखीत केली आहे त्यामुळे विद्यार्थी अध्यापन इतर इमारती घेतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण मिळत नाही ही बाब लक्षात घेऊन जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे यांनी बाणगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील सुसज्ज व नवीन इमारत बांधकामासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या विभागाकडे पाठपुरावा सुरू केला होतो जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन विभागाच्या अंतर्गत अखेर शाळेला 3 वर्ग खोली बांधकामासाठी निधी मंजूर करून दिला असून उर्वरित राहिलेल्या वर्ग खोल्यासाठी लवकरच निधी मिळणार आहे या वेळी यावेळी बाणगाव बुद्रुक ग्रामपंचायत चे सदस्य नारायण कवडे,शांतारामकाका कवडे,ग्रामसेवक युवराज निकम,सजनतात्या कवडे,रविंद्र कवडे,चांगदेव देवकर, खिर्डी विका सोसायटी अध्यक्ष नंदू खरात,अतुल कवडे,प्रमोद घोडके,रघुनंदन काजळे,गणेश कवडे,विजय कवडे,आदी गावातील नागरिक उपस्थित होते.


बाणगाव बुद्रुक – येथे जि.प.शाळेत नवीन वर्गखोली बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे उपसरपंच वैशाली कवडे ग्रामपंचायत सदस्य नारायण कवडे,शांतारामकाका कवडे, ग्रामसेवक युवराज निकम,सजनतात्या कवडे,रविंद्र कवडे,चांगदेव देवकर,नंदू खरात,अतुल कवडे,प्रमोद घोडके,रघुनंदन काजळे, गणेश कवडे,विजय कवडे,आदी



