ताज्या घडामोडी

लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल , रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये फादर्स डे उत्साहात साजरा

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा

  नांदगाव ता.१९ येथील नमन एज्युकेशन सोसायटी’संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल तसेच रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव  शाळेत  फादर्स डे अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.          

     विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल,उपाध्यक्ष.सरिता बागुल लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा.खांडेकर,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली   कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांमध्ये शाळेच्या विद्यार्थिनींनी आलेल्या सर्व वडिलांचे औक्षण करून स्वागत केले.शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालकांसाठी सरप्राईज नृत्य व गायन सादर केले यावेळी उपस्थितीत काही उत्साही पालकांनी देखील आपल्या मुलांसोबत नृत्य करून वडील- मुलांमधील नाते वृध्दींगत केले. विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने आपल्या वडिलांचे चरण पूजन व औक्षण करून त्यांचा आशीर्वाद घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे शाळेच्या शिक्षिका अनिता जगधने व शिक्षक .योगेश शेवाळेयांनी केले.वंदे मातरमने गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे  सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतोनात मेहनत घेऊन घेतली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.