नांदगाव पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.१८ आगामी होऊ घातलेल्या बकरी ईद,व आषाढी एकादशी,आदी धार्मीक सणांच्या पाश्वभूमीवर नांदगांव पोलीस स्टेशन मध्ये शहरातील प्रतिष्ठित नागरिक,मौलाना,शांतता समितीची बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीला मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख यांनी मार्गदर्शन केले यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री.शेख म्हणाले की आगामी बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात यावे व धार्मिक सलोखा राखावा या बाबत आव्हान करण्यात आले तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता ठेवावी अशी सूचना या वेळी दिल्या.पुढे ते म्हणाले की मानवी जीवन एकमेकावर अवलंबुन आहे.कोरोनामुळे विस्कटलेली घडी सावरण्याचे काम सध्या चालू आहे.सोशलमिडीयावर भ्रमणध्वनीव्दारे सामाजिक तेड निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करु नहे तसे काही वेगळे संदेश प्रसारित होत असेल तर पोलिसाना कळवावे आम्ही त्वरित एक्शन घेऊ,आपणास काही वेगळी माहिती मिळाली तर लगेच कळवा,माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेऊ,गैरसमज प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करु,यावेळी बैठकीचे प्रास्ताविक नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे- पाटील यांनी केले तर सहायक पोलीस निरीक्षक दिपक सुरवाडकर यांनी आभार मानले यावेळि सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज,वाघमारे,गोपनीय आंमलदार दत्ता सोनवणे आदी अधिकारी उपस्थित होते.यावेळी पत्रकार संजीव धामणे,बाळासाहेब कवडे,नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश शेळके,बिएमजे फाउन्डेशनचे मारुती जगधने, किरण भालेकर,मन्सुरी आरीप,सौदागर,जॉईन ग्रुप,अकील शेख, मुक्ती फईम,जुबेर शेख,महमद शेख,मास्टर टेलर,सह नागरिक उपस्थित होते.



