ताज्या घडामोडी

अँड विद्याताई कसबे यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा

नांदगाव,ता १४  येथील क्रियाशील सामाजिक कार्यकर्त्या अँड विद्याताई कसबे यांना सामाजिक क्षेत्रात महिलांच्या प्रश्नावर भरीव कृतिशील कामगिरी केल्याबद्दल शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास वर्गीय यांच्या प्रमुख उपस्थितीत व  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते मनमाड येथे अँड विद्याताई कसबे यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला कोरोना काळात कर्त्या पुरुषाच्या निधनांनंतर कोलमडून पडलेल्या एकल महिलाना न्याय मिळवून देण्यासाठी अँड विद्याताई कसबे यांनी  मोठा पाठपुरावा केला त्यांच्या या पाठपुराव्यामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात विधवा एकल महिला व बालकांना  स्थिरस्थावर होण्यास मोठा हातभार लागला आहे याशिवाय उपेक्षित वंचित घटकातील महिलांसाठी आधार बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून अँड कसबे यांच्या कामाची सामाजिक स्तरावर घेतली जात असते  तालुका पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागाच्या समितीवर त्यांनी महिलांचे सामाजिक प्रश्न धसास लावले आहेत या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या अंजूमताई कांदे,तहसीलदार डॉ.सिद्धार्थकुमार मोरे गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्यासह मनमाड, नांदगाव पालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे व अन्य मान्यवर उपस्थितीत होते  आमदार सुहास कांदे यांनी अँड विद्याताईं कसबे चे अभिनंदन केले
आहे 

 नांदगाव:- सामाजिक कार्यकर्त्या अँड विद्याताई कसबे यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करतांना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास वर्गीय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार,गणेश शिंदे,पंकज खताळ आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.