ताज्या घडामोडी

दैनिक सकाळचे प्रतिनिधी ” बाबासाहेब कदम ” यांना जिल्हास्तरीय सन २०२२-२३ चा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ने सन्मानित

पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे- एस. एम .देशमुख

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
नाशिक ता. १३ : जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे (रजि.) जीवनगौरव तथा जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. ११) मविप्रच्या आडगाव येथील डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या अश्विनी हॉलमध्ये झाला.दैनिक सकाळ चे बाणगाव बुद्रुक प्रतिनिधी व गर्जा महाराष्ट्र24 चे मुख्यसंपादक,नाशिक स्टार न्यूज चे नांदगाव तालुका’प्रतिनिधी बाबासाहेब कदम यांना २०२२-२३ चा जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख अध्यक्षस्थानी होते. मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे,जिल्हा समनव्यक संजीव निकम नांदगाव तालुका संघाचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत भालेराव मराठी पत्रकार परिषदेच्या डिजीटल मिडिया सेलचे प्रमुख अनिल वाघमारे,नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके
आदी प्रमुख पाहुणे होते. प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघ व वाडीव-हे येथील दिवंगत पत्रकार अशोक शिंदे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान केले.
संस्थापक जिल्हाध्यक्ष पवार यांनी प्रास्तविकात जिल्हा पत्रकार संघाचा इतिहास व वाटचाल सांगितली.ॲड.नितीन ठाकरे यांनी या प्रसंगी म्हणाले की दिवस रात्र समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आपले सर्वस्व समर्पित करणाऱ्या पत्रकारांना विदेशात चांगल्या प्रकारे मानधन किंवा पगार मिळत असतो. मात्र भारतात तसे होत नाही अशी खंत व्यक्त केली.समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार प्रयत्नशील असतो.मात्र समाज किंवा शासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. आगामी काळात पत्रकारांच्या आरोग्यासंदर्भात जिल्हा पत्रकार संघाच्या सहयोगातून मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयातर्फे जिल्हा किंवा तालुकास्तरावर मोफत सर्व रोगनिदान शिबिर घेण्यासाठी.सहकार्य करू, असे सांगितले. मुख्य विश्वस्त श्री देशमुख यांनी पत्रकारांनी बदलत्या जगाचा वेध घेत आजच्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे सांगून पत्रकारांच्या अडचणी आणि व्यथा मांडल्या. शेतकरी आणि पत्रकारांच्या व्यथा सारख्याच आहेत.कारण दोघांच्याही समस्यांची दखल शासन घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी साठी आंदोलन करण्याची वेळ आली असून बदलत्या जगाचा वेध घेत आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात होणाऱ्या बदलांना सामोरे जात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा.भविष्यात डिजिटल प्लॅटफॉर्मचा देखील स्वीकार करून पत्रकारितेला वृद्धिगंत करावे.सोबतच पत्रकारांच्या मूळ प्रत्रांकडे नजर अंदाज न करता वेळोवेळी शासनाकडे होते. संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करावा,असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले.
सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अष्टिवकर आदींनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर जिल्ह्यातील पत्रकारांना मुख्य विश्वस्त देशमुख यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित केले.सुहास सुरळीकर यांनी सूत्रसंचालन केले.जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे यांनी आभार

फोटो ओळ
नाशिक : दैनिक सकाळ बाणगाव बुद्रुक व नाशिक स्टार न्यूज तालुका प्रतिनिधी बाबासाहेब कदम यांना नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सन २०२२ -२३ चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करताना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख.समवेत मिलिंद अष्टिवकर,जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार,जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे व इतर. (छाया संजीव निकम )

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.