ताज्या घडामोडी

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उद्या होणाऱ्या मतदाप्रक्रिया साठी नांदगाव ला यंत्रणा सज्ज

नांदगाव तालुक्यात मतदान केंद्रावर मतदान साहित्य वाटप

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.19 देशात लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या महि्याभरापासून सूरू असलेला प्रचाराच्या तोफा काल शनिवारी त.18 सायकळी सहाला थंडवल्या सर्वपक्षीय नेत्यांनी प्रचार फेरी काढत शक्ती प्रदर्शन केले आज सकाळी दहा वाजल्यापासून तालुक्यातील मतदान केंद्रावर साहित्य वाटप केले आहे.

सोमवारी ( ता.20 ) मे रोजी असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील पाचव्या टप्प्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघा अंतर्गत ११३-नांदगाव विधानसभा मतदार संघाची मतदान प्रक्रियेची यंत्रणा सज्ज असून, विधानसभा मतदारसंघात ३३१ मतदान केंद्रे आहेत.त्यासाठी राखीव पथकासह एकूण ३६५ पथक तयार केले असून प्रत्येक पथकामध्ये १ मतदान केंद्राध्यक्ष,३ मतदान अधिकारी,१ वर्ग-४ चे कर्मचारी व १-पोलीस कर्मचारीसह एकूण ६ सदस्य आहेत.त्यातही ५ पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या आणि जास्त घनता असलेल्या ठिकाणी एकूण १६६ मतदान केंद्रांवर वेब कास्टींगची सुविधा पुरविण्यात आली आहे. सद्यास्थितीत तीव्र उन्हाळा लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावर 1 मेडिकल कीट तसेच किमान आवश्यक सुविधांची (पिण्याचे पाणी, रॅम्प,शौचालय इ.) व्यवस्था करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे प्रत्येक मतदानाचे ठिकाणी आरोग्य सेविका/आशा सेविकां,स्वयंसेविकाची नेमणूक करण्यात येत आहे.

मतदारांना मतदार यादीतील नोंदीबाबतच्या तपशिलाच्या मतदार स्लिप….

वाटण्याचे काम पूर्ण झाले आहे. निवडणूककामी 12 मे रोजी अधिकारी आणि कर्मचा-यांचे द्वितीय प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. अंध दिव्यांग मतदारांना सर्व मतदान केंद्रांवर रॅम्प,व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

*****
दिव्यांगाना रांगेत उभे न राहता मतदान करता येणार आहे.अंध,दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सर्व मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र तळ मजल्यावर घेण्यात आले आहे.


११३- नांदगाव विधानसभा मतदार संघातील एकूण ४ मतदान केंद्रात पर्दानशीन (बुरखाधारी) महिला मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे या प्रत्येक केंद्रात महिला मतदार कर्मचा-याची नेमणूक करण्यात आली आहे.
विधानसभा मतदार १ दिव्यांग मतदार कर्मचा-यांचे मतदान केंद्र २ पिंकबुथ म्हणजे महिला मतदार कर्मचा-यांचे मतदान केंद्र,२ आदर्श मतदान केंद्र आणि २ युवा मतदार कर्मचारी केंद्र मतदानासाठी उपलब्ध राहणार आहे.अशी माहिती तहसीलदार सुनिल सेंदाने नायब तहसिलदार चेतन कोनकर यांनी दिली आहे

नांदगाव मतदारसंघातील मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी विशेष काळजी घेतली जात असून या निवडणुकीत शहर व तालुक्यातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा,असे आवाहन तहसीलदार सुनील सैदाणे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विवेक धांडे,गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.

*****

नांदगाव तालक्यातील शहरी व ग्रामीण भागातील मतदारांना आवाहन करण्यात येत की उद्या दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे मतदान होत आहे मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आपले मतदानाचे आद्यकर्तव्य पार पाडावे

सुनिल सैदाणे – तहसीलदार नांदगाव

नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांचे मतदारांना आवाहन

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.