लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ शिबिरे, मेळाव्यांच्या आयोजनावर निर्बंध

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नाशिक, ता.२३ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम घोषित केला असून,निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्शआचार संहिता अंमलात आलेली आहे. या पार्श्वभूमिवर नाशिक जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात/ भाषा/ धार्मिक शिबिरे/मेळाव्यांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जलज शर्मा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून निर्गमित केले आहेत. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 06.06.2024 पर्यंत) अंमलात राहतील. सदर आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कारवाई केली जाईल, असे आदेशात म्हटले आहे.



