
गर्जा महाराष्ट्र २४ वृतसेवा
नांदगाव ता.०१ आगामी निवडणुकांची तयारी सुरू असतानाच नांदगाव तालुक्यात मनसेला खिंडार पडले आहे तालुकाध्क्ष प्रदिप थोरात व अनेक पदाधिकारी,व कार्यकर्त्यांचा केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आगामी निवडणुकांसाठा सर्वच पक्षांना जोरदार तयारी सुरू केली आहे.सभा,बैठका,दौरे,जागावाटप यांच्या चर्चा सुरू आहेत.इतर पक्षांप्रमाणेच मनसेने देखील आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे,बैठका,चर्चा सुरू असतानाच नांदगाव तालुक्यात मनसेला खिंडार पडल्याचं दिसून येत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप थोरात,शहराध्यक्ष अभिषेक विघे,राजाभाऊ उशीरे,प्रशांत वाघ,मयूर कुलकर्णी दीपक नंन्नावरे,रेखाताई शेलार अकीला शेख,सोना करनर,विनोद पवार,किरण अहिरे,राज माळवतकर,चेतन पेंढारकर पप्पू सोनवणे विष्णू लकडे उमेश जेजुरकर मयूर खरोटे,कुणाल शेवरे,परसराम हरळे आदींनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.(शनिवारी) दिंडोरी लोकसभा मतदारसंघांच्या खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेला नांदगांव तालुक्यात मोठा धक्का बसला आहे.त्यावेळी भाज्यपाच्या जेष्ठ नेत्या जयश्रीताई दौंड, जिल्हाध्यक्ष,शंकरआण्णा वाघ,भाजपा व्यापारी आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दत्तराज छाजेड,विधानसभा मदारसंघ प्रमुख पंकज खताळ तालुकाध्क्ष,गणेश शिंदे,महिला आघाडी तालुका प्रमूख मनिषा काकड,युवा शहरध्यक्ष अशोक पेंढारकर,मंत्री डॉ भारतीताई पवार यांचे स्वीय सहायक डॉ प्रवीण रोंदळ,बाबाजी शिरसाठ,सतिश शिंदे सकल सुतार लोहार संघटनेचे पदाधिकारी संजय कदम,सुनिल शेलार,सुभाष पेंढारकर,नदुलाल आहिरे,मधुकर खैरनार,आदी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थितत होते.

फोटो ओळ
नांदगाव: येथील हनुमाननगर मध्ये संवाद कार्यक्रमात मनसेचे तालुकाध्क्ष प्रदिप थोरात यांच्या प्रवेश करतेवेळी स्वागत करताना केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारतीताई पवार,जेष्ठ नेत्या जयश्रीताई दौंड,गणेश शिंदे,अशोक पेंढारकर,संजय कदम, आदी



