लासलगाव येथे भीषण अपघात रेल्वेने उडवल्याने ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
रेल्वे अपघाती चौकशी करणार - ना भारती पवार
गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज
वृत्तसेवा
नाशिक ता.१३ : नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये ४ रेल्वे कामगारांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. लासलगाव – उगाव रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रेल्वे कामगारांचा मृत्यूने स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते.कि मी 230 व पोल नंबर 15 ते 17 मधी ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू असताना.सदर कामा खालील ट्रक मेंटेनर कर्मचारी काम करत असतांना कर्मचाऱ्यांना रेल्वे लाईनची मेंटनेस करणारे टॅावरने धडक दिल्याने हा अपघात झाला.या अपघातात जबर मार लागण्याने चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.मृतांची नावे 1) संतोष भाऊराव केदारे (वय 38 वर्षे ) 2) दिनेश सहादु दराडे वय 35 वर्षे 3) कृष्णा आत्मराम अहिरे वय (40 वर्षे )4) संतोष सुखदेव शिरसाठ वय (38 वर्षे)
लासलगाव रेल्वे घटनेनंतर साथीदारांनी जीव गमावल्याचे कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्यानंतर त्यांनी रेल्वे रोको चा मार्ग अवलंबला.सुमारे वीस मिनिटे गोदावरी एक्सप्रेस लासलगाव स्टेशन मध्ये अडविण्यात आले होते
सदर घटनेची माहिती मिळताच केंदीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना भारती पवार यांनी घटनास्थळी भेट देत निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन संबंधितांकडून घटनेची माहिती घेतली.मृतांच्या नातेवाईकांनी ना.डॉ.भारती पवार यांच्याकडे सदर अपघाताची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली गेली या अपघातामुळे रेल्वे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातात मरण पावलेले चारही कामगार हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्यापैकी तिघे तर घरातले एकुलते एक कर्ते कमावते होते.त्यांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत व्हावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते शंकरराव वाघ यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांच्याकडे केली.
*****
रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू हे अतिशय धक्कादायक गोष्ट असून या घटनेला जबाबदार असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांनी यावेळी केले.



