मनमाड – करंजवन पाणी पुरवठा योजनेला निधी कमी पडून देणार नाही :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
करंजवण - मनमाड पाणी पुरवठा योजनेचे व शिवसृष्टी चे भूमिपूजन सोहळा दिमाखात संपन्न

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज : वृत्तसेवा
मनमाड ता.१४ पाणी हा जनतेचा मुलभूत प्रश्न असल्याने करंजवण – मनमाड पाणी पुरवठा पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल.हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. विविध विकास कामांच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम आमदार सुहासआण्णा कांदे करीत आहे,नादगावं तालुक्यातील जनतेच्या विविध विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंमंत्री एकनाथ शिंदे यांनी करंजवन-मनमाड पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्याच्या प्रसंगी बोलताना नांदगाव तालुकावासीयांना दिली.
पुढे ते म्हणाले की या पाणी पुरवठा योजनेला स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याबद्दल आमदार सुहास आण्णा कांदे यांचे मी आभार व्यक्त करतो या योजनेमुळे मनमाड वासीयांना दररोज पाणी मिळणार आहे.मनमाडवासीयांच्या दैनंदिन आयुष्यात बदल घडविणारी ही योजना असल्याने यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे यावेळी त्यांनी नमूद केले.मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की,नांदगाव तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मनमाड येथे एम.आय.डी.सी.सुरु करण्याकरिता लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.तसेच जनतेच्या कामासाठी जे.सी.बी व फिरते दवाखाने,फिरते कार्यालये या मतदारसंघात आ.सुहासआण्णा कांदे यांनी सुरु केल्याने या संकल्पनेचे त्यांनी कौतुक केले.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी प्रास्ताविकात मनमाड नगपरिषद ला इमारत बांधण्यासाठी १० कोटी मागणी केली व नार पार योजनेत नांदगाव तालुक्याचा समावेश करण्याची मागणी केली असता याच सभेत मनमाडच्या नगरपरिषदेच्या इमारती साठी १० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा तात्काळ जाहीर केली.या वेळी तालुक्यातील १५० दिव्यांगाना मोफत सायकल वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच नांदगाव व मनमाडला भव्य अशा शिवसृष्टी चे भूमिपूजन ऑनलाइन करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत भाषणात पाणी पुरवठा योजनेच्या विभागाच्या वतीने होत असलेल्या कामाची माहिती दिली यावेळी केंदीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या व नार पार योजनेत नांदगाव तालुक्याच्या समावेश होण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच यावर निर्णय होण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी विविध पक्षातील आजी- माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.यात प्रामुख्याने राजाभाऊ पगारे माजी नगराध्यक्ष मनमाड,मनमाड चे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील (राष्ट्रवादी),नांदगाव चे राष्ट्रवादी चे नगरसेवक माजी शहराध्यक्ष बाळ काका कलंत्री,माजी जि प सदस्य राजेंद्र पवार,महेंद्र शिरसाठ,दिलीप तेजवानी आदींनी प्रवेश केला.
प्रसंगी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार,बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत व नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे,जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे विलासराव आहेर,नांदगांव नगरपालिका माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,मनमाड माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जे.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाधर डी,पोलिस अधीक्षक शहाजी उमप, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल,मालेगाव अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती तहसीलदार,डॉ सिद्धार्थ कुमार मोरे,गटविकास अधिकारी,गणेश चौधरी,नांदगाव नगरपालिकेचे मुख्यधिकारी विवेक धांडे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी,आणि मतदार संघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले,या सोहळ्याला तालुक्यातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थिती होते सोहळा यशस्विततेसाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख किरण देवरे, युवा सेना जिल्हाधिकारी फरहान खान, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष गुलाब भाबड उप जिल्हा प्रमुख सुनील हांडगे,तालुका प्रमुख साईनाथ गिडगे,शहरप्रमुख मयूर बोरसे कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.



