ताज्या घडामोडी

चाळीसगाव जवळ अपघातात नांदगावचे दोघे दुचाकीस्वार ठार

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज
नांदगाव (जि. नाशिक) ता १५ : चाळीसगाव तालुक्यातील खडकी जवळील नव्या राष्ट्रीय महार्गावर आज दुपारी दोन दुचाकींच्यात झालेल्या भीषण अपघातात नांदगाव येथील दोघे ठार झाले.
यात ढेकू येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक व परधाडी येथील सेवानिवृत्त लष्करी जवानाचा समावेश आहे.या घटनेमुळे नांदगाव व परधाडी येथे हळहळ व्यक्त होत आहे.आज दुपारी चार वाजेच्या सुमाराला नांदगावहून चाळीसगावकडे दुचाकीने जाणाऱ्या व समोरून येणाऱ्या दुचाकीशी जबरदस्त धडक झाली.
त्यात दोघाही दुचाकीचे अतोनात नुकसान झाले व दुचाकीस्वारांचा जागेवरच मृत्यू झाला.चाळीसगाव पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.तालुक्यात ढेकू खुर्द येथील प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले योगेश आनंदा जाधव (४६) हे आपले मित्र विजय सोळसे यांच्यासह नांदगाव येथील आपल्या घरून दुपारी चाळीसगावला नव्या दुचाकीने निघाले होते.
या घटनेमुळे नांदगाव व परधाडी येथे हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी चार वाजेच्या सुमाराला नांदगावहून चाळीसगावकडे दुचाकीने जाणाऱ्या व समोरून येणाऱ्या दुचाकीशी जबरदस्त धडक झाली.त्यात दोघाही दुचाकीचे अतोनात नुकसान झाले व दुचाकीस्वारांचा जागेवरच मृत्यू झाला.चाळीसगाव पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे

तालुक्यात ढेकू खुर्द येथील प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले योगेश आनंदा जाधव (४६) हे आपले मित्र विजय सोळसे यांच्यासह नांदगाव येथील आपल्या घरून दुपारी चाळीसगावला नव्या दुचाकीने निघाले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.