दैनिक सकाळ व गर्जा महाराष्ट्र24’चे बाबासाहेब कदम यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे रविवारी नाशिक मध्ये मान्यवरांच्या हस्ते होणार गौरव

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सन २०२२-२३ चा जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार बाणगावचे दैनिक सकाळ बातमीदार व नाशिक स्टार न्यूज चे तालुका प्रतिनिधी व गर्जा महाराष्ट्र24’चे मुख्यसंपादक बाबासाहेब कदम यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ने रविवारी ( ता.११ )नाशिक मध्ये मान्यवरांच्या हस्ते होणार गौरविले जाणार आहे.
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि.नाशिक चे सन २०२२-२३ या वर्षांतील जिल्हास्तरीय जीवनगौरव व उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार गौरव सोहळा रविवार दि.११ जून २०२३ रोजी दुपारी १२ वाजता डाॅ.वसंतराव पवार मेडिकल हाॅस्पिटल,आडगाव (नाशिक) येथील ऑडिटोरियम हाॅल मधे आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यात प्रमुख पाहुणे छगनराव भुजबळ माजी उपमुख्यमंत्री.ना.नरहरी झिरवळ उपाध्यक्ष,विधानसभा, महाराष्ट्र राज्य,मुंबई तथा विधानसभा सदस्य,दिंडोरी मतदार संघ तर कार्यक्रमाचे अध्यक्ष.एस.एम.देशमुख मुख्यविश्वस्त,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,मुंबई तर प्रमुख अतिथी गंगाधरन डी.जिल्हाधिकारी, नाशिक.बी.जी.शेखर पाटील.विशेष पोलिस महा निरक्षक,नाशिक परिक्षेत्र
शहाजी उमाप,पोलीस अधिक्षक,नाशिक ग्रामिण मिलींद कुलकर्णी कार्यकारी संपादक,दैनिक लोकमत,नाशिक शर्मिष्ठा धारगे वालावलकर पोलिस अधिक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक अड नितिनभाऊ ठाकरे सरचिटणीस,मराठा विद्या प्रसारक समाज,नाशिक बाळासाहेब क्षिरसागर सभापती,मराठा विद्या प्रसारक समाज,नाशिक.मिलींद अष्टिवकर कार्याध्यक्ष,मराठी पत्रकार परिषद,मुंबई या मान्यवर अतिथींकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्या येणार आहे अशी माहिती नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि.नाशिक चे संस्थापक-जिल्हाध्यक्ष.यशवंतराव पवार व जिल्हाध्यक्षआण्णासाहेब बोरगुडे यांनी दिली आहे.



