ताज्या घडामोडी
सप्तशृंगी गड गणेश घाटात बस दरीत कोसळली – एक महिला प्रवाशी मृत्य

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
नाशिक ता.१२ / सप्तश्रृंगी देवीच्या गडावरून मुक्कामी असलेल्या खामगाव डेपोची एस.टी.बस घाट उतरतं असताना बुधवारी सकाळी गणेश घाटात अंदाजे २००ते ३०० फूट खोल घाटात गेल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात १ महिला प्रवाशीचा मृत्यू झाला आहे .
या बस मधील अंदाजे २२ प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक मिळत आहे अपघाताची माहिती मिळताच गडावरील ग्रामस्थनी मदत कार्य सुरू केले आहे घटनास्थळी शासकीय यंत्रणा पोहचली आहे गडावर
प्रत्यक्ष प्रवासी व जखमींची अजून संख्या प्राप्त नाहीत. बहुतेक २२ प्रवासी असावेत असा अंदाज आहे.वणी ग्रामिण रुग्णालयात पंधरा जखमीवर उपचार सुरु आहे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी दाखल झाले आहे.






