बाणगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.पल्लवी प्रमोद घोडके बिनविरोध निवड
गावची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बिनविरोध निवडीची परंपरा कायम

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा
बाणगाव बुद्रुक ता १४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बिनविरोध निवडीची परंपरा करत राज्यात एक निवीण आदर्श निर्माण करणाऱ्या.बाणगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक यावेळीही बिनविरोध पार पडली शनिवारी(ता.०७)रोजी उपसरपंचपदी पल्लवी प्रमोद घोडके यांची बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक युवराज निकम यांनी केली.
उपसरपंच वैशाली कवडे यांनी आवर्तन पध्द्तीने राजीनामा दिल्याने रिक्त उपसरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायतीच्या आवारात शनिवारी निवडणूक घेण्यात आली उपसरपंचपदासाठी पल्लवी घोडके यांच्या नावाची सूचना ग्रामपंचायत सदस्या सुनीता रवींद्र देवकर यांनी मांडली त्यास सर्व सदस्यांनी संमती दर्शवत उपसरपंचपदी पल्लवी प्रमोद घोडके यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.ग्रामपंचायच्या सरपंचपदी सर्वानुमते थेट सरपंचपदी संगीता गोविंद बागुल विराजमान आहे गावातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आज पर्यंत सर्व बिनविरोध निवडणुकीचे श्रेय जेष्ट नेते बापूसाहेब कवडे यांच्या कडे जाते.यावेळी ग्रामपंचायतच्या बिनविरोध निवडून आलेल्या उपसरपंच सौ पल्लवी प्रमोद घोडके यांचा सत्कार गावच्या वतीने सरपंच संगिता बागुल यांनी फुलगुच्छ शाल देऊन करण्यात आला.नवनिर्वाचित उपसरपंच पल्लवी घोडके यांचे अभिनंदनपर शुभेच्छा जेष्ट नेते बापूसाहेब कवडे,आमदार सुहास कांदे यांनी केले.या निवडी प्रसंगी जेष्ट नेते बापूसाहेब कवडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा बाणगाव बुद्रुक सोसायटीचे अध्यक्ष तेज कवडे,ग्रामसेवक युवराज निकम ग्रामपंचायत माजी उपसरपंच,नारायण कवडे,सुनील कवडे,ग्रामपंचायत सदस्य शांतारामकाका कवडे,रावसाहेब बागुल,माजी उपसरपंच वैशाली कवडे ग्रामपंचायत सदस्या जण्याबाई कवडे,अलका कवडे,सुनीता देवकर,बाणगाव बुद्रुक विकास सोसायटी उपाध्यक्ष अभिमान कवडे,माजी सरपंच,शांताराम पाटील,भाऊसाहेब कवडे,संजय फणसे,प्रभाकर कवडे,सजनतात्या कवडे,चांगदेव देवकर,बाबासाहेब देवकर,रवींद्र कवडे,संदीप कवडे,अतुल कवडे,किशोर आहेर,रमेश निकम,रवींद्र देवकर,प्रमोद घोडके,संजय लासुरे,राजेंद्र घोडके,ज्ञानगिर गोसावी,अरुण सोनवणे,दत्तू लासुरे,पोलीस पाटील वाल्मिक गोराडे,रामेश्वर कवडे,राजेंद्र घोडके, अनिल घोडके,संतोष करडे जयराम जाधव,सुरेश शिंदे,राजेंद्र कवडे,प्रवीण कवडे आदी उपस्थित होते.
*****प्रतिक्रिया***
जेष्ट नेते बापूसाहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवू तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू
सौ. पल्लवी घोडके,नवनिर्वाचित उपसरपंच बाणगाव बुद्रुक

:- बाणगाव बुद्रुक :- येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पल्लवी प्रमोद घोडके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना सरपंच संगिता बागुल समवेत जेष्ट नेते बापूसाहेब कवडे, बाणगाव बुद्रुक विकास सोसायटीचे अध्यक्ष तेज कवडे,ग्रामसेवक युवराज निकम,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदी



