मालेगावात गुप्त धनासाठी ९ वर्षांच्या मुलाचा नरबळी

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
मालेगाव ता २३ .गुप्त धनाच्या लालसेपोटी एका ९ वर्षीय बालकाचा अपहरण करून त्याचा नरबळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना पुरोगामी महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना मालेगावच्या पोहाणे येथे
उघड झाली आहे. या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी एका भोंदू बाबासह ४ आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे

मालेगावच्या पोहाणे गावात रोमा बापू मोरे,रमेश लक्ष्मण सोनवणे,गणेश लक्ष्मण सोनवणे,लक्ष्मण नवल सोनवणे,उमाजी गुलाब मोरे राहतात लक्ष्मणचा मोठा मुलगा रमेश याच्या अंगात येऊन तो भोंदूगिरी करत होता.त्याने सांगितले की त्यांच्या शेतातील विहिरीजवळ गुप्त धन असून ते मिळविण्यासाठी एका बालकाचा बळी द्यावा लागेल.त्याचे ऐकून सर्वांनी मिळून घरा बाहेर खेळत असलेल्या कृष्णा सोनवणे या बालकाला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याला एक आठवड्या पूर्वी पळवून नेले आणि त्याचा बळी दिला त्यानंतर त्याचा मृतदेह एका शेतात पुरला

.मात्र म्हणतात ना की गुन्हा लपत नाही.इकडे कृष्णाच्या पालकांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलीस त्याचा तपास करीत होते.ज्या ठिकाणी कृष्णाचा मृतदेह पुरला होता तेथून दुर्गंधी येत होती.याची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले.त्यात त्याची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तपासाची चक्र फिरविल्यानंतर नरबळीचा प्रकार उघडकीस आला
पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपीना अटक केली असून एक आरोपी फरार असल्याची माहिती ग्रामीण जिल्हा पोलिस प्रमुख शहाजी उमप यांनी दिलीदेशात पुरोगामी राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्यात आजही काही लोकांमध्ये अंधश्रद्धा ठासून भरलेली असून त्या अंधश्रद्धेचा बळी नऊ वर्षाचा कृष्णा ठरला आहे.



